दिलासादायक : सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये होणार कर्करोगाचे निदान अन् उपचार

कर्करोग विभाग सुरू, महात्मा फुले आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत होणार उपचार

On
दिलासादायक : सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये होणार कर्करोगाचे निदान अन् उपचार

लातूर/प्रतिनिधी : शहरातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयाला संलग्नित असलेल्या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये (अतिविषेशोपचार रुग्णालय) मंगळवार, दि. ४ फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिनाचे औचित्य साधून कर्करोग विभाग कार्यान्वित करण्यात आला आहे. दरम्यान, सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सुरू झालेल्या कर्करोग विभागात कर्करोगाचे निदान होणार आहेत. शिवाय उपचार हे महात्मा फुले आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत होणार असल्यामुळे सर्वसामान्य रूग्णांना दिलासा मिळणार आहे.

शहरातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रूग्णालय परिसरात प्रधानमंत्री स्वास्थ सुरक्षा योजनेंतर्गत (पी.एम.एस.एस.वाय) फेज-३ अंतर्गत चार मजली सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलची उभारणी करण्यात आली आहे. याठिकाणी वैद्यकीय महाविद्यालयाचा बाह्यरूग्ण विभाग सुरू आहे. त्याचबरोबर मागीन दोन महिन्यांपासून ऋदयरोगाशी संबंधित ॲन्जिओग्राफी शस्त्रक्रिया, मेंदूविकारासंदर्भात न्युरोसर्जरी, मुतखड्या संदर्भाती युरोसर्जरी आदी शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. या शस्त्रक्रिया महागड्या असल्यामुळे आर्थिकदृष्ट्य दुर्बल घटकातील रूग्णांना खासगी रूग्णालयामध्ये शस्त्रक्रिया करणे शक्य होत नाही. परंतु, आता या महागड्या शस्त्रक्रिया एमजेपीजेएवाय योजनेंतर्गत मोफत होत असल्यामुळे सर्वसामान्य रूग्णांना दिलासा मिळत आहे.

दरम्यान, ४ फेब्रुवारी या जागतिक कर्करोग दिनाचे औचित्य साधून सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कर्करोग माहिती, निदान आणि उपचारासाठी विभाग सुरू करण्यात आला आहे.  कर्करोग विभागाचे उद्घाटन प्रसंगी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि  रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. उदय माहिते यांच्या हस्ते झाले. यावेळी  सुपरस्पेशालिटीचे विशेष कार्य अधिकारी डॉ. किरण होळीकर, वैद्यकीय अधिक्षक डॉ. सचिन जाधव, डॉ. मेघराज चावडा, डॉ. नीलिमा देशपांडे, डॉ. बी.बी. यादव, डॉ. मंगेश सेलूकर, डॉ. सुमित  वाघमारे, डॉ. स्वामी सर ,डॉ योगेश जाधव सर, डॉ आदित्य हंडरगुळे आदींसह डॉक्टर, परिचारिका आदींची उपस्थिती होती.

Dhages

सुपरस्पेशालिटी रूग्णालयात सुरू करण्यात आलेल्या कर्करोग विभागात कर्करोग तज्ञ डॉ. अमोल कोटलवार, डॉ. गौरव बिराजदार हे सेवा देणार आहे. सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत रूग्णालयात कर्करोग संदर्भात तपासणी केली जाणार आहे. शिवाय ज्या कर्करोग बाधित रूग्णांना आवश्यक औषधोपचार अर्थात केमोथेरपी लागेल अशा रूग्णांना महात्मा फुले आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत योजनेंतर्गत मोफत उपचार दिले जाणार असल्यामुळे रूग्णांना दिलासा मिळणार आहे.

याप्रसंगी डॉ अमोल कोटलवार कर्करोग तज्ञ व विभाग प्रमुख यांनी कर्करोग जनजागृती म्हणजेच कर्करोग विषयीची माहिती जसे कर्करोग होण्याची कारणे त्याची लक्षणे व प्रतिबंधात्मक उपाय यावर रुग्णांना माहिती दिली कर्करोगाची लक्षणे असल्यास रुग्णांनी त्वरित कॅन्सर  तज्ञांकडून निदान करून लवकरात लवकर उपचार केल्यास कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकतो असे सांगितले. 

रूग्णांनी लाभ घ्यावा

सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सुरू झालेल्या कर्करोग विभागात कर्करोगाचे निदान आणि उपचार होणार आहेत.  महात्मा फुले आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत हे उपचार मोफत होणार आहेत. तरी परिसरातील नागरिकांनी, रूग्णांनी याचा लाभ घ्यावा. -  डॉ. उदय मोहिते, अधिष्ठाता

 

Tags:

Advertisement

Latest News

'लाडकी बहीण' योजनेसंदर्भात आता केवायसीचा नवीन नियम!  'लाडकी बहीण' योजनेसंदर्भात आता केवायसीचा नवीन नियम!
Ladki Bahin Yojna New Rule for KYC :  लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीचा हप्ता येण्याची लाडक्या बहिणी वाट बघत असतानाच, आता...
1 एप्रिलपासून वाहनधारकांसाठी 'हा' नवीन नियम लागू...!
महाकुंभाचा परिणाम; अयोध्येतील राम मंदिराने उत्पन्नाचे विक्रम मोडले!  
भरधाव स्कॉर्पिओ घुसली हॉटेलात; एकाचा मृत्यू, सात जण जखमी
'लव्ह जिहाद' कायद्याचे मुख्यमंत्री फ़डणवीसांनी केले समर्थन!
बिग NEWS : आयपीएल-2025चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर, कोणता संघ कोणासोबत लढणार!
शरद पवारांचा युवा आमदार अजित पवारांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात रंगली चर्चा!