राज्यपाल राधाकृष्णन यांच्या हस्ते 'कव्हेकर पिता-पुत्रांचा सन्मान'  

मुंबईत नवभारत 'सीएसआर अवार्ड-2025' ने सन्मानीत; JSPMच्या शिरपेचात मानाचा तुरा

On
राज्यपाल राधाकृष्णन यांच्या हस्ते 'कव्हेकर पिता-पुत्रांचा सन्मान'  

लातूर :  शिक्षणामध्ये लातूर पॅटर्न देशभरात गाजलेला आहे. या लातूर पॅटर्नमध्ये योगदान देणार्‍या व शिक्षणाला सामाजिक व मानवी चेहरा देणार्‍या लातूरच्या जयक्रांती शिक्षण प्रसारक मंडळ (जेएसपीएम) संस्थेला नवभारत सीएसआर अवार्ड देऊन सन्मानीत करण्यात आले.

यामध्ये जेएसपीएमचे संस्थापक अध्यक्ष माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर, उपाध्यक्ष अजितसिंह कव्हेकर व कार्यकारी संचालक रंजितसिंह पाटील कव्हेकर यांना महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्याहस्ते मुंबईतील परेल येथील आयसीटी ग्रँड सेंटर येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमात राज्यातील नामांकित नवभारत सीएसआर अवार्ड -2025 देऊन सन्मानीत करण्यात आले.

या गौरव सोहळ्याला बजाज फाऊंडेशनचे चेअरमन शिशिर बजाज, मेघाश्रय या संस्थेच्या संस्थापक विश्‍वस्त श्रीमती सिमा सिंग, नवभारत ग्रुपचे प्रबंध संपादक निमिष माहेश्‍वरी, वैभव माहेश्‍वरी, नवभारतचे श्रीनिवास सर आदींसह देशभरातील मान्यवर उपस्थित होते. गुणवत्तापूर्ण शिक्षणाची कास धरून शिक्षणातून मानवचेतना आणि समाजवर्तनाचा विकास करणे हे ध्येय ठेवून स्थापन करण्यात आलेल्या जेएसपीएम शिक्षण संस्थेचा उद्देश कौशल्यावर आधारित शिक्षणातून कौशल्ययुक्‍त मनुष्यबळ निर्माण करणे, शिक्षणातील बदलते प्रवाह आणि मुलभूत गरजांची सांगड घालणे, मुल्यशिक्षण आणि व्यावसायिकता याचा सुयोग्य मेळ घालण्याचे काम जेएसपीएम शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गेल्या चाळीस वर्षापासून सुरू आहे. तरी शिक्षण, सेवा व सामाजिक कार्याची दखल घेऊन जेएसपीएमचे सर्वेसर्वा कव्हेकर पिता-पुत्रांना सीएसआर अवार्ड -२०२५ मिळाल्याबद्दल संस्थेच्या या दैदिप्यमान यशाबद्दल जेएसपीएम संस्थेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Dhages

जेएसपीमच्या माध्यमातून ११५३०  नागरिकांची नेत्र तपासणी करून २८०० नागरिकांवर शस्त्रक्रिया करून त्यांना नवी दृष्टि देण्याचे काम केले. आत्महत्याग्रस्त १५० परिवारांना प्रत्येकी १०००० ते १५००० हजाराची मदत करून त्यांच्या कुटुंबातील मुलांना शिक्षणासाठी दत्तक घेण्याचे काम केले. सेवालायातील अनाथ मुलांनाही सर्वतोपरी मदत करण्याचे काम केले.  याबरोबरच   विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान मिळावे यासाठी मराठवाड्यातील पहिला एआय कोर्स जेएसपीएम संस्थेमार्फत सुरू करण्याचे काम केले. एक वृक्ष एक विद्यार्थी हा उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना वृक्ष लागडवीसह संगोनणासाठी प्रेरीत करण्याचे काम केले. 

Tags:

Advertisement

Latest News

'लाडकी बहीण' योजनेसंदर्भात आता केवायसीचा नवीन नियम!  'लाडकी बहीण' योजनेसंदर्भात आता केवायसीचा नवीन नियम!
Ladki Bahin Yojna New Rule for KYC :  लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीचा हप्ता येण्याची लाडक्या बहिणी वाट बघत असतानाच, आता...
1 एप्रिलपासून वाहनधारकांसाठी 'हा' नवीन नियम लागू...!
महाकुंभाचा परिणाम; अयोध्येतील राम मंदिराने उत्पन्नाचे विक्रम मोडले!  
भरधाव स्कॉर्पिओ घुसली हॉटेलात; एकाचा मृत्यू, सात जण जखमी
'लव्ह जिहाद' कायद्याचे मुख्यमंत्री फ़डणवीसांनी केले समर्थन!
बिग NEWS : आयपीएल-2025चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर, कोणता संघ कोणासोबत लढणार!
शरद पवारांचा युवा आमदार अजित पवारांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात रंगली चर्चा!