महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर, कसा चेक करणार निकाल
निकालातील त्रुटीवर आक्षेप कसा घेता येणार, जाणून घ्या सविस्तर
Maharashtra TET Exam Result : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेबाबत महत्वाची माहिती हाती आली आहे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे.
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 इयत्ता 1 ली ते 5 वी इयत्ता आणि 6 वी ते 8 वी निकाल जाहीर करण्यात आला आहे. हा निकाल परिषदेच्या http://mahatet.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे. याविषयी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली आहे.
.jpeg)
निकालातील त्रुटीवर आक्षेप कसा घ्यावा?
दोन्ही परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या उमेदवारांना त्यांचा निकाल हा ३१ जानेवारीपासून वेबसाईटवर पाहण्यासाठी उपलब्ध आहे. या परीक्षेच्या निकालाच्या अनुषंगाने गुणपडताळणी करावयची असल्यास अथवा त्रुटी आक्षेप असल्यास http://mahatet.in या वेबसाईटवर नोंदवता येईल.
Dhages

या वेबसाईटवर ६ फेब्रुवारी २०२५ पर्यंत उमेदवारांच्या लॉगीनमधून ऑनलाइन पद्धतीने नोंदविता येईल. इतर मार्गाने आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नसल्याचेही परिषदेने स्पष्ट केले आहे. तसेच निकाल राखीव ठेवण्यात आलेल्या उमेदवारांनी त्यांचे निवेदन 6 फेब्रुवारीपर्यंत mahatet24.msce@gmail.com या इमेलवर पाठवण्यास सांगण्यात आलं आहे. त्यानंतर प्राप्त झालेल्या निवेदनांचा विचार केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी, असेही अनुराधा ओक यांनी कळवले आहे.
