'बिग बॉस मराठी- 5' चे पुन्हा एकदा टेलिकास्ट होणार!

On
'बिग बॉस मराठी- 5' चे पुन्हा एकदा टेलिकास्ट होणार!

बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन खूप चर्चेत आला होता. आणि आता सुद्धा या सीझनची चर्चा होतेय याचं कारण म्हणजे आता या गाजलेल्या सिझनचे सर्व एपिसोड्स  टीव्हीवर पर पाहता येतील. कारण आता हा सिझन पुन्हा एकदा टेलिकास्ट होतो आहे.

बिग बॉस मराठीचे पाचवे पर्व चांगलेच गाजले होते. 70 दिवसांच्या या पर्वात एकूण 17 सदस्य सहभागी झाले होते. बॉलीवूड तसेच मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता रितेश देशमुखने आपल्या दमदार शैलीत 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळली होती.

रितेशच्या 'भाऊच्या धक्क्या'ने 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाचाला रंगत आणली. हा 'भाऊचा धक्का' पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये नेहमी उत्सुकता असायची. रितेश आता कोणाची कान उघडणी करतो आणि कोणाची शाळा घेतो,याची सातत्याने उत्सुकता असायची.  आता हे सर्व भाग हे पुन्हा एकदा एन्जॉय करता येतील.

'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वात पहिल्या दिवसापासून भांडणं पाहायला मिळाली. कोणत्या ना कोणत्या कारणावरून सतत सदस्यांमध्ये भांडण व्हायचं. पण या पर्वातील सदस्यांनी अक्षरशः राडा केला. काही जण खूप ट्रोल झाले. पाचव्या पर्वात सर्व नाती बनली होती. कोणामध्ये चांगलं मैत्रीत्व झालं, तर कोणी भाऊ-बहीण झालं. हे पर्व संपून चार महिने हे पूर्ण होतील. आता चार महिन्यांनंतर याचा हा शो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Dhages

28 जूलै रोजी ही शो प्रसारित झाला होता आणि सोबतच 6 ऑक्टोबर रोजी सत्तर दिवसांनी हा शो संपला होता.आता हा शो येत्या 10 फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. 10 फेब्रुवारीपासून 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाचं पुनःप्रक्षेपण होणार आहे. दररोज दुपारी 3 वाजता 'कलर्स मराठी' वाहिनीवर हे पर्व प्रसारित होणार आहे. या पर्वाचा विजेचा सुरज चव्हाण ठरला होता आणि उपविजेता अभिजीत सावंत ठरला होता. त्यामुळे त्याची बरीच चर्चा होती. आता हा कल्ला आणि रितेश होस्टिंग पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. 

Tags:

Advertisement

Latest News

'लाडकी बहीण' योजनेसंदर्भात आता केवायसीचा नवीन नियम!  'लाडकी बहीण' योजनेसंदर्भात आता केवायसीचा नवीन नियम!
Ladki Bahin Yojna New Rule for KYC :  लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीचा हप्ता येण्याची लाडक्या बहिणी वाट बघत असतानाच, आता...
1 एप्रिलपासून वाहनधारकांसाठी 'हा' नवीन नियम लागू...!
महाकुंभाचा परिणाम; अयोध्येतील राम मंदिराने उत्पन्नाचे विक्रम मोडले!  
भरधाव स्कॉर्पिओ घुसली हॉटेलात; एकाचा मृत्यू, सात जण जखमी
'लव्ह जिहाद' कायद्याचे मुख्यमंत्री फ़डणवीसांनी केले समर्थन!
बिग NEWS : आयपीएल-2025चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर, कोणता संघ कोणासोबत लढणार!
शरद पवारांचा युवा आमदार अजित पवारांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात रंगली चर्चा!