महाकुंभमेळ्यात प्रा. मोटेगावकर यांना देशसेवेत कार्यरत असणाऱ्या शिष्याची अनोखी भेट
प्रमोशन झाल्यानंतर गुरूच्याच हाताने शिष्याने लावला 'डेप्युटी कमांडंट'चा बॅच
लातूर/प्रतिनिधी : प्रा. मोटेगावकर सर विद्यार्थी माझे दैवत आहे या उक्तीप्रमाणे नेहमीच कार्य करत असतात. ज्ञानदानाबरोबरच, धार्मिक सामाजिक कार्यातून ते नेहमीच चर्चेत असतात.
.jpeg)
दरम्यान सद्यस्थितीत उत्तरप्रदेश राज्यातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याच्या वसंत पंचमी च्या शाही स्नानासाठी सपत्निक प्रा. शिवराज मोटेगावकर सर गेले असता सरांचा 2012 बॅच चा विद्यार्थी वैभव बडे बीएसएफमध्ये असिस्टंट कमांडेंट (काश्मीर) म्हणून कार्यरत आहे. तो आपल्या संपूर्ण तुकडीसह प्रा . मोटेगावकर यांच्याकडे धावत आला आणि सर म्हणून प्रा. मोटेगावकर यांना घट्ट मिठी मारली. सरांचे आशीर्वाद घेतले.
Dhages

नुकतेच त्यांचे प्रमोशन झाले होते आणि आपले प्रमोशन झाल्यानंतर सर्वप्रथम आपल्या गुरूच्या हस्ते असिस्टंट कमांडेंट चा बॅच आपल्या खांद्यावर परिधान केला. यावेळी प्रा. मोटेगावकर सरांनी वैभव बडे त्याला जवळ घेत पेढा भरवत तोंड गोड केले.

या गुरुशिष्यातले प्रेम, गुरुभेट संगमावरील जनसमुदाय बघत होते. साधुसंतही या क्षणाचे साक्षीदार होते,हे दृश ते कुतूहलाने पाहू लागले गुरु आणि शिष्य या दोघांचेही डोळे भरून आले,दोघांचाही डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले.

वैभव बडे हा मूळचा रेणापूर तालुक्यातील चुकारवाडी या छोट्याशा खेड्याचा रहिवाशी आहे ,आई- वडील दोघेही शेती करतात. 2012 मध्ये 12 वी आरसीसी लातूर शाखेत पूर्ण करून त्याची अश्विनी मेडिकल कॉलेज सोलापूर येथे एमबीबीएस शिक्षणासाठी निवड झाली.

एमबीबीएस शिक्षण पूर्ण झाल्यावर जिद्दीने आणि नव्या उमेदीने राष्ट्रसेवेत आपले संपूर्ण आयुष्य झोकून द्यायचे म्हणून या धेयवेढ्या विद्यार्थ्याने 2020 मध्ये बीएसएफ जॉईन केले आणि मागिल महिन्यातच असिस्टेंट कमांडेंट म्हणून प्रमोशनही झाले. प्रमोशननंतर आपले कार्य बजावण्यासाठी काश्मीरवरून त्याची नियुक्ती उत्तरप्रदेश येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यासाठी झाली असताना या महाकुंभमेळ्याच्या त्रिवेणीसंगमाबरोबरच गुरुशिष्याच्या पवित्र नात्याला उजळा मिळाला.
वैभव बडे हा अतिशय सामान्य कुटुंबातील विद्यार्थी असून,खूप हुशार होता. फक्त आई-वडिलांच्या स्वप्नांना गवसणी घालण्यासाठी त्याने एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले आणि देशसेवेत स्वतःला झोकून दिले. मिलेट्री मध्ये एवढ्या मोठ्या पदावर तो कर्तव्य बजावत असला तरी त्याने माझ्याप्रती दाखवलेली श्रद्धा,प्रेम यामुळे मी गहिवरून गेलो. माझा कंठ दाटून आला.माझे आशीर्वाद नेहमीच्या त्याच्या सोबत असतील. - प्रा. शिवराज मोटेगावकर, संचालक (आरसीसी पॅटर्न) |