मोठी बातमी : भारत सलग दुसऱ्यांदा अंडर-19 महिला टी-20 विश्वविजेता बनला
दक्षिण आफ्रिकेचा केला पराभव; त्रिशाने 33 चेंडूत 44 धावांची खेळी केली, ठरली सामनावीर
SA Women U19 vs IND Women U19 : भारताने सलग दुसऱ्यांदा महिला अंडर-19 टी-20 विश्वचषक जिंकला आहे. अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 9 गडी राखून पराभव केला.
भारताने 2023 मध्ये स्पर्धेचे पहिले विजेतेपद पटकावले होते. सलग दुसऱ्यांदा विजय मिळवत महिला खेळाडूंनी भारताचे नाव सर्वत्र कोरले.
.jpeg)
क्वालालंपूर येथे रविवारी दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि 20 षटकांत सर्वबाद 82 धावा केल्या.
प्रत्युत्तरात भारतीय संघाने 11.2 षटकांत 1 गडी गमावून 83 धावांचे लक्ष्य गाठले. जी त्रिशाने 33 चेंडूत 44 धावांची खेळी केली. 3 विकेट्सही घेतल्या. सानिका चालकेने 22 चेंडूत 26 धावांची नाबाद खेळी खेळली.
𝗖. 𝗛. 𝗔. 𝗠. 𝗣. 𝗜. 𝗢. 𝗡. 𝗦! 🏆#TeamIndia 🇮🇳 are the ICC U19 Women’s T20 World Cup 2025 Champions 👏 👏
— BCCI Women (@BCCIWomen) February 2, 2025
Scorecard ▶️ https://t.co/hkhiLzuLwj #SAvIND | #U19WorldCup pic.twitter.com/MuOEENNjx8
भारताने सलग दुसऱ्यांदा १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकला
भारताचा १९ वर्षांखालील महिला संघ या स्पर्धेचा गतविजेता आहे. 2023 मध्ये त्यांनी अंतिम सामन्यात इंग्लंडला हरवून विजेतेपद जिंकले आणि आता सलग दुसऱ्यांदा भारतीय संघाने विश्वचषक विजेतेपद जिंकले आहे.
Dhages

2023 मध्ये झालेल्या पहिल्याच सामन्यात कसा रचला होता इतिहास
2023 साली दक्षिण आफ्रिकेत पार पडलेल्या पहिल्या वहिल्या अंडर-19 वूमन्स टी-20 वर्ल्डकप स्पर्धेवर भारताने आपलं नाव कोरलं होते. भारतीय संघाने प्रतिस्पर्धी इंग्लंड संघाला केवळ 68 धावांवर रोखून निर्धारित लक्ष्य 3 विकेट्सच्या मोबदल्यात केवळ 14 षटकांत गाठलं होतं. पहिल्याच अंडर-19 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने नाव कोरलं होतं. तेव्हा भारतीय संघाचे सर्वत्र कौतुकही झाले.
दोन्ही संघांचे प्लेइंग-११ भारत
निकी प्रसाद (कर्णधार), जी त्रिशा, जी कमलिनी (यष्टीरक्षक), सानिका चाल्के, ईश्वरी अवासरे, मिथिला विनोद, आयुषी शुक्ला, व्हीजे जोशिता, शबनम शकील, पारुणिका सिसोदिया, वैष्णवी शर्मा.
दक्षिण आफ्रिका प्लेइंग-11
कायला रेनेके (कर्णधार), जेम्मा बोथा, सिमोन लॉरेन्स, कराबो मेसो (यष्टीरक्षक), फे काउलिंग, मिकी व्हॅन वुर्स्ट,सेश्नी नायडू, दियारा रामलकन, अॅशले व्हॅन विक, मोनालिसा लेगोडी, थाबिसेंग निनी.
