अवैध बांगलादेशी रोहिंग्या पाकिस्तानी घूसखोरांवर कारवाई करा; पालकमंत्र्याकडे मागणी
कारवाईसाठी हिंदुत्व जागर संघटना आक्रमक
लातूर/प्रतिनिधी : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये, जन्माची नोंद करण्यासंदर्भात मागणी अर्जांची संख्या अचानक पणे खूप वाढली आहे, आणि अशी मागणी करणारे 99% अर्ज हे बांगलादेशी रोहिंग्या मुस्लिम लोकांचे आहेत.
भाजपा नेते माजी खा.किरीट सोमय्या हे अवैध बांगलादेशी रोहिंग्या घुसखोर या विषयावर सखोल व गांभीर्याने काम करत आहेत. माजी खा.किरीट सोमय्या यांनी शासकीय कार्यालयातून काढलेल्या माहिती अन्वये लातूर जिल्ह्यामध्ये जन्म मृत्यू नोंदणी बाबत एकूण प्राप्त अर्जदाराची संख्या ही 9981 आहे.
.jpeg)
मागणी अर्जासोबत जे कागदपत्र जोडलेली असतात त्यामध्ये प्रामुख्याने आधार, रेशन कार्ड अशी कागदपत्र जोडली आहेत ज्यांना पुरावा म्हणून वैध धरले जात नाही. म्हणजेच प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणामध्ये हलगर्जी व भ्रष्टाचार होताना दिसत आहे. अवैध घुसखोर हे राष्ट्रीय सुरक्षेसाठी व कायदा सुव्यवस्थेसाठी फार मोठा धोका आहेत. तसेच बनावट कागदपत्रांच्या आधारे ही लोक सर्व शासकीय योजनांचा लाभ घेत आहेत.
अवैध घुसखोर तसेच त्यांना सहकार्य करणाऱ्या नागरिक तसेच प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यावर त्वरित कडक कार्यवाही करणे हे राष्ट्रहिताच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी जिल्हा व पोलीस प्रशासनाला ह्या संदर्भामध्ये योग्य त्या सूचना कराव्यात तसेच जोपर्यंत लातूर जिल्ह्यातील एक ना एक घुसखोर पकडला जात नाही, त्याच्यावर व त्याला सहकार्य करणाऱ्या वर कायदेशीर कार्यवाही होत नाही, तोपर्यंत आपण ह्या विषयामध्ये जातीने लक्ष घालावे अश्या आशयाची मागणी यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आली.
Dhages

निवेदनावर भाजपा शहर जिल्हा उपाध्यक्ष व हिंदुत्व जागर संघटनेचे अध्यक्ष मनोज सूर्यवंशी,प्रदीप मोरे,संतोष तोष्णीवाल, श्याम भराडीया,संतोष पांचाळ,महादेव ढमणे, शिवकांत ब्रिजवासी, व्यंकटेश कुलकर्णी लक्ष्मीकांत कुलकर्णी,यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
