दिल्ली विधानसभा निवडणुकीत केजरीवालांना मोठा धक्का, 8 आमदारांचा भाजपात प्रवेश
कालच पक्ष सोडल्याची केली होती घोषणा, केजरीवालांची का सोडली होती साथ, जाणून घ्या राजकारण
AAP Mla join BJP : दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपचे नेते अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का बसला आहे. शुक्रवारी आम आदमी पक्षाच्या 8 आमदारांनी पक्ष सोडला होता. तोच आज सर्व आमदारांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का मानला जात आहे.
.jpeg)
या आमदारांनी केला भाजपमध्ये प्रवेश?
भाजपमध्ये सामील झालेल्या आप आमदारांमध्ये त्रिलोकपुरीचे आमदार रोहित मेहरौलिया, जनकपुरीचे आमदार राजेश ऋषी, कस्तुरबा नगरचे आमदार मदनलाल, पालमचे आमदार भावना गौर, मेहरौलीचे आमदार नरेश यादव, आदर्श नगरचे आमदार पवन शर्मा, बिजवासनचे आमदार बीएस जूनआणि मादीपूरचे आमदार गिरीश सोनी यांचा समावेश आहे.
Dhages

पक्ष सोडण्यापूर्वी आमदारांनी काय केला आरोप?
आम आदमी पक्षातून राजीनामा दिलेल्या आमदारांनी त्यांच्या पत्रात म्हटले होते की, आम आदमी पक्षाची स्थापना ज्या प्रामाणिक विचारसरणीवर झाली होती त्यापासून पक्ष आता पूर्णपणे भरकटला आहे. आम आदमी पक्षाची ही अवस्था पाहून मला खूप वाईट वाटते. आम आदमी पक्षातून बाहेर पडलेले 8 आमदार तिकीट न मिळाल्याने संतप्त होते आणि इतर पक्षांच्या संपर्कात होते.
