उद्यापासून बदलणार आहेत 'हे' पाच नियम, नागरिकांनो जाणून घ्या!
दैनदिन जीवनात काय फरक पडणार, उद्या सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प
देशातील सर्व नागरिकांच्या माहितीसाठी ही उद्यापासून म्हणजेच 1 फेब्रुवारी पासून काही नवे बदल होणार आहेत.1 फेब्रुवारीपासून नवीन महिना सुरू होत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. याशिवाय नव्या महिन्यात काही नवे बदल होणार आहेत.पुढील महिन्यापासून एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीपासून यूपीआयशी संबंधित नियमांमध्ये पुन्हा एकदा मोठा बदल होणार आहे. ते मोठे बदल कोणते होणार आहेत ते जाणून घेऊ.
.jpeg)
एलपीजीची किंमत
एलपीजीचे दर दर महिन्याच्या पहिल्या तारखेला देशभरात बदलले जातात. इंधन कंपन्या एलपीजी सिलिंडरच्या किंमती अपडेट करतात. त्यामुळे अर्थसंकल्पाच्या दिवशी एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात होणार की वाढ होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सिलिंडरच्या किमतीतील बदलाचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होतो. कंपन्यांनी १ जानेवारी रोजी १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत कपात केली होती.
युपीआय
युपीआयशी संबंधित नियमांमध्ये पुन्हा एकदा मोठा बदल होणार आहे. नॅशनल पेमेंटकॉर्पोरेशन ऑफ इंडियानं काही यूपीआय व्यवहार रोखण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात परिपत्रकही काढण्यात आलं होतं. हे नवे नियम १ फेब्रुवारी २०२५ पासून लागू होतील. १ फेब्रुवारीपासून स्पेशल कॅरेक्टरसह तयार करण्यात आलेल्या आयडीद्वारे व्यवहार स्वीकारले जाणार नाहीत. एनपीसीआयच्या म्हणण्यानुसार, १ फेब्रुवारीपासून ट्रान्झॅक्शन आयडीमध्ये फक्त अल्फान्यूमेरिक कॅरेक्टर्स (अक्षरं आणि अंक) वापरले जातील. स्वतंत्र ट्रान्झॅक्शन आयडी जनरेट केल्यास पेमेंट फेल होईल.
Dhages

मारुतीच्या कार
देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडनं (एमएसआयएल) वाढत्या इनपुट कॉस्ट आणि ऑपरेटिंग कॉस्टची भरपाई करण्यासाठी १ फेब्रुवारीपासून आपल्या मॉडेल्सच्या किंमतीत ३२,५०० रुपयांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑल्टो के १०, एस-प्रेसो, सेलेरियो, वॅगनआर, स्विफ्ट, डिझायर, ब्रेझा, अर्टिगा, इको, इग्निस, बलेनो, सियाज, एक्सएल ६, फ्रँक्स, इनव्हिक्टो, जिम्नी आणि ग्रँड व्हिटारा या मॉडेल्सच्या किंमतीत वाढ होणार आहे.
बँकिंग नियम
कोटक महिंद्रा बँकेनं आपल्या ग्राहकांना आपल्या सामान्य सुविधा आणि शुल्कांमध्ये आगामी बदलांची माहिती दिली आहे. हे बदल १ फेब्रुवारी २०२५पासून लागू होतील. यामध्ये मोफत एटीएम व्यवहाराच्या मर्यादेत सुधारणा आणि विविध बँकिंग सेवांसाठी अपडेटेड शुल्काचा समावेश आहे.
ATF चे दर
एअर टर्बाइन इंधनाच्या (एटीएफ) दरात १ फेब्रुवारीपासून बदल होण्याची शक्यता आहे. इंधन कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला हवाई इंधन आणि टर्बाइन इंधनाच्या किंमतीत सुधारणा करतात. म्हणजेच १ फेब्रुवारीला त्यांच्या किमतीत बदल झाला तर त्याचा थेट परिणाम विमान प्रवाशांच्या खिशावर होणार आहे.
