उद्योगपती गौतम अदानींच्या मुलाच्या लग्नाची तारीख निश्चित! पाहा
देशातील प्रसिद्ध उद्योगपती आणि अदानी उद्योग समूहाचे चेअरमन गौतम अदानी यांचे सुपुत्र जीत अदानी यांच्या लग्नाची तारीख निश्चित झाली आहे. जीत अदानी हे अदानी एअरपोर्ट्सचे संचालक असून ते दिवा जैमिन शाह यांच्यासोबत विवाहबंधनात अडकणार आहेत.त्यांच्या साखरपुड्याचा सोहळा १२ मार्च २०२३ रोजी पार पडला होता आणि आता त्यांच्या लग्नाची अधिकृत तारीखही जाहीर झाली आहे.
.jpeg)
पारंपरिक आणि साध्या पद्धतीने होणार आहे विवाह
गौतम अदानी यांनी महाकुंभमेळ्यातील धार्मिक विधींमध्ये सहभागी झाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना जीत अदानी यांच्या लग्नाबद्दल माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केले की, हा विवाह अत्यंत साध्या आणि पारंपरिक पद्धतीने होईल. “आम्ही सामान्य लोकांसारखेच आहोत, त्यामुळे लग्न कोणत्याही भव्य सेलिब्रिटी सोहळ्यासारखे नसेल,” असे अदानी यांनी सांगितले.
पहा लग्नाच्या तारखा आणि स्थळ
जीत अदानी आणि दिवा जैमिन शाह यांचा विवाह ७ फेब्रुवारी २०२५ रोजी पार पडणार आहे. याआधी ५ फेब्रुवारी २०२५ पासून लग्नाचे विविध विधी आणि कार्यक्रम सुरू होतील. हा सोहळा अहमदाबादमध्ये होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या लग्नाला फक्त ३०० हून अधिक पाहुण्यांना आमंत्रित केले जाईल. मात्र यावर अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती मिळालेली नाही. गौतम अदानी यांनी या लग्नात सेलिब्रिटींची मोठी गर्दी नसेल असे जाहीर केले असले तरी सोशल मीडियावर अनेक नामवंत व्यक्ती या विवाहसोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Dhages

गौतम अदानी आपल्या पत्नी आणि मुलासोबत महाकुंभमेळ्यातील पवित्र स्नान आणि पूजा-अर्चना केल्यानंतर माध्यमांना दिसले. यावेळी त्यांनी आपल्या कुटुंबातील धार्मिक आणि सांस्कृतिक मूल्यांना महत्त्व असल्याचे अधोरेखित केले.त्यामुळेच जीत अदानी यांचा विवाह अत्यंत पारंपरिक पद्धतीने साजरा केला जाणार आहे.
गौतम अदानी हे भारतातील आघाडीचे उद्योगपती असल्याने त्यांच्या कुटुंबातील हा विवाहसोहळा चर्चेचा विषय ठरत आहे. भव्यदिव्य लग्न सोहळ्यांपेक्षा पारंपरिक पद्धतीला महत्त्व देण्याचा निर्णय अदानी कुटुंबाने घेतला आहे हे विशेष आहे.
या विवाहसोहळ्याबद्दल अधिकृत माहिती पुढील काही दिवसांत समोर येईल. अदानी कुटुंबाच्या या साध्या आणि खास सोहळ्याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. सर्व माध्यम सोहळ्याच्या अपडेट्स कडे लक्ष ठेवून आहेत.
