मोठी बातमी! पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या निवास्थानावर दिल्ली पोलिसांची छापेमारी

दिल्ली विधानसभा निवडणूकीच्या काळातच आप नेत्यावर बडी कारवाई, CM मान यांनी केला निषेध

On
मोठी बातमी! पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या निवास्थानावर दिल्ली पोलिसांची छापेमारी

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान काही दिवसांवर आलं असताना निवडणूक आयोग आणि दिल्ली पोलिसांनी आपच्या नेत्यांना मोठा धक्का दिला आहे. निवडणूक आयोगाचे पथक पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या दिल्लीतील निवासस्थान असलेल्या कपूरथला हाऊसमध्ये झडती घेण्यासाठी पोहोचलं आहे.

भाजप नेत्यांने तक्रारप तक्रारीवरून ही कारवाई करण्यात येत आहे. पंजाबमधून मोठ्या प्रमाणात दिल्लीत पैसे आणि दारू आणली जात आहे आणि कपूरथळा हाऊसमध्ये लपवली जात असल्याचा आरोप केला होता.  असे सांगितले जात आहे की निवडणूक आयोगाचा एक अधिकारी दिल्ली पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसह कपूरथळा हाऊसच्या बाहेर उभा आहे. मात्र आत जाण्याची परवानगी नाही. पंजाब पोलिसांचे अधिकारी पंजाब पोलिसांच्या डीआयजींशी आत जाण्याच्या परवानगीबाबत चर्चा करत आहेत. 

दिल्ली पोलिसांच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, निवडणूक आयोगासह जिल्हा पोलिसांचे एक पथक घटनास्थळी उपस्थित आहे. आरओ आणि एफएसटीच्या तक्रारीवरून ही कारवाई केली जात आहे. एफएसटीच्या सुरक्षेसाठी पोलिसांची उपस्थिती आवश्यक आहे. या संपूर्ण प्रकरणात रिटर्निंग ऑफिसर आणि एसडीएम चाणक्यपुरी ओपी पांडे यांनीही निवेदन दिले आहे.

निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की, आम्हाला निवडणूक आयोगाच्या cVIGIL पोर्टलवर तक्रार मिळाली आहे की कपूरथळा हाऊसमधून पैसे वाटले जात आहेत, म्हणूनच आम्ही आलो आहोत. आम्हाला १०० मिनिटांच्या आत तक्रार निकाली काढावी लागेल. आतून परवानगी मागितली आहे. आमची टीम ४ वाजता दाखल झाली आहे, १०० मिनिटांपेक्षा जास्त वेळ झाला आहे मात्र आत प्रवेश नाकारण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या टीमला काम करू दिले जात नसल्याची तक्रार आम्ही एसएचओकडे केली आहे. आम्ही अजूनही आत जाण्याची वाट पाहात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 

Dhages

निवडणूक आयोगाच कृत्य निषेधार्ह : भगवंत मान

या संपूर्ण प्रकरणात भगवंत मान म्हणाले की, आज निवडणूक आयोगाचे पथक दिल्ली पोलिसांसह कपूरथळा हाऊसवर छापा टाकण्यासाठी दिल्लीतील माझ्या घरी पोहोचलं आहे. भाजपचे लोक दिल्लीत उघडपणे पैसे वाटत आहेत पण दिल्ली पोलिस आणि निवडणूक आयोगाला काहीही दिसत नाही. या सगळ्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. एक प्रकारे, दिल्ली पोलिस आणि निवडणूक आयोग भाजपच्या इशाऱ्यावर पंजाबी लोकांना बदनाम करत आहेत, जे अत्यंत निषेधार्ह आहे. 

Tags:

Advertisement

Latest News

'लाडकी बहीण' योजनेसंदर्भात आता केवायसीचा नवीन नियम!  'लाडकी बहीण' योजनेसंदर्भात आता केवायसीचा नवीन नियम!
Ladki Bahin Yojna New Rule for KYC :  लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीचा हप्ता येण्याची लाडक्या बहिणी वाट बघत असतानाच, आता...
1 एप्रिलपासून वाहनधारकांसाठी 'हा' नवीन नियम लागू...!
महाकुंभाचा परिणाम; अयोध्येतील राम मंदिराने उत्पन्नाचे विक्रम मोडले!  
भरधाव स्कॉर्पिओ घुसली हॉटेलात; एकाचा मृत्यू, सात जण जखमी
'लव्ह जिहाद' कायद्याचे मुख्यमंत्री फ़डणवीसांनी केले समर्थन!
बिग NEWS : आयपीएल-2025चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर, कोणता संघ कोणासोबत लढणार!
शरद पवारांचा युवा आमदार अजित पवारांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात रंगली चर्चा!