'डायमंड वॉरिअर्स'ने पटकावले लातूर बॅडमिंटन लीगचे विजेतेपद 

दयानंद महाविद्यालयाच्या प्रांगणातील इनडोअर स्टेडिअममध्ये पार पडली स्पर्धा

On
'डायमंड वॉरिअर्स'ने पटकावले लातूर बॅडमिंटन लीगचे विजेतेपद 

'Diamond Warriors' win Latur Badminton League title लातूर :  लातूर बॅडमिंटन लीगच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विविध वयोगटातील बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद श्रीकांत हिरेमठ यांच्या  डायमंड वॉरिअर्सने पटकावले आहे.

आशिष हरिप्रसाद सोमाणी यांच्या संकल्पनेतून लातूर बॅडमिंटन लीग स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. 
प्रत्येक व्यक्तीने आपल्या शरीर सदृढतेकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आरोग्य हीच खरी संपत्ती मानून ' हेल्थ इज वेल्थ ' हे ब्रीदवाक्य घेऊन सदर  स्पर्धा लातूरच्या दयानंद महाविद्यालयाच्या प्रांगणातील इनडोअर स्टेडिअममध्ये घेण्यात आली. शनिवार  आणि रविवारी ही स्पर्धा घेण्यात आली.

WhatsApp Image 2025-01-30 at 7.14.49 PM

स्पर्धेचे उदघाटन खा. डॉ. शिवाजी काळगे , पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर  पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. स्पर्धेपूर्वी जिल्हा क्रीडा संकुल ते इनडोअर स्टेडिअमपर्यंत रॅली काढण्यात आली . रॅलीमध्ये विविध स्तरातील मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.  यावेळी दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण  लाहोटी, सचिव रमेश बियाणी यांसह  अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

Dhages

दोन आठवडे प्रत्येक शनिवार आणि रविवारी पार पडलेल्या या स्पर्धेसाठी एकूण ३०० बॅडमिंटन खेळाडूंनी नोंदणी केली होती. त्यामधून २०० खेळाडूंची स्पर्धेसाठी निवड करण्यात आली होती. स्पर्धेत वर्ष ३० ते ४०, ४१ ते ५० ,  ५१ ते ६० , ६१ ते ७० वर्ष वयोगटातील खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला. स्पर्धेचा अंतिम  सामना श्रीकांत हिरेमठ यांच्या डायमंड वॉरियर्स आणि लक्ष्मीकांत कालिया यांच्या माहेश्वरी रॉयल्स या दोन संघात झाला.

यामध्ये डायमंड वॉरिअर्सने विजेतेपद पटकावले. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ लातूर जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष सतीश देशमुख, सचिव एड. आशिष बाजपायी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. लातूरमध्ये बॅडमिंटन खेळणाऱ्यांची संख्या वाढावी, त्यांना त्याकरिता सर्वतोपरी सहकार्य करण्याच्या उद्देशाने आशिष सोमाणी यांनी लातूर बॅडमिंटन लीगची संकल्पना मूर्त स्वरूपात आणली आहे.

लातूर बॅडमिंटन लीगच्या माध्यमातून नियमितपणे अशा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असल्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. स्पर्धेच्या आयोजनासाठी  आनंद लाहोटी, बाबुराव गायकवाड, आनंद बंग, दुर्गेश ब्रिजवासी, श्रीकांत चांडक, पवन मालपाणी यांसह  क्रीडाप्रेमींनी सहकार्य केले.  

Tags:

Advertisement

Latest News

'लाडकी बहीण' योजनेसंदर्भात आता केवायसीचा नवीन नियम!  'लाडकी बहीण' योजनेसंदर्भात आता केवायसीचा नवीन नियम!
Ladki Bahin Yojna New Rule for KYC :  लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीचा हप्ता येण्याची लाडक्या बहिणी वाट बघत असतानाच, आता...
1 एप्रिलपासून वाहनधारकांसाठी 'हा' नवीन नियम लागू...!
महाकुंभाचा परिणाम; अयोध्येतील राम मंदिराने उत्पन्नाचे विक्रम मोडले!  
भरधाव स्कॉर्पिओ घुसली हॉटेलात; एकाचा मृत्यू, सात जण जखमी
'लव्ह जिहाद' कायद्याचे मुख्यमंत्री फ़डणवीसांनी केले समर्थन!
बिग NEWS : आयपीएल-2025चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर, कोणता संघ कोणासोबत लढणार!
शरद पवारांचा युवा आमदार अजित पवारांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात रंगली चर्चा!