राज ठाकरेंची स्थिती गझनीच्या हिरोसारखी, त्यांनी अजित पवारांवर बोलू नये

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राज ठाकरेंना सुनावले; मनसे प्रमुखांनी निवडणुकीवरुन केली होती टीका

On
राज ठाकरेंची स्थिती गझनीच्या हिरोसारखी, त्यांनी अजित पवारांवर बोलू नये

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून अजित पवारांवर निशाणा साधल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे.

राज ठाकरे यांची स्थिती गझनीच्या हिरोसारखी झाली आहे. त्यांनी अजित पवारांवर बोलू नये. कारण ते उठ दुपारी आणि घे सुपारी वाले नाहीत, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी म्हटले आहे.

राज ठाकरे यांनी गुरुवारी मनसेच्या मेळाव्यात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधानसभा निवडणुकीतील यशावर भाष्य केले होते. लोकसभा निवडणुकीत अजित पवारांचा केवळ 1 खासदार निवडून आला होता. त्यानंतर चारच महिन्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे 42 आमदार निवडून आले. हे कसे घडले? हा सर्व प्रकार संशयास्पद आहे, असे ते म्हणाले होते.

त्यांना उशिरा उठून चिंतन करण्याची सवय

राज ठाकरे यांच्या या विधानावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुरज चव्हाण व आनंद परांजपे यांच्यासह आमदार अमोल मिटकरी यांनी जोरदार पलटवार केला. अमोल मिटकरी यांनीही या प्रकरणी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. स्वतःच्या घरात दारुण पराभव झालेल्या लोकांनी आम्हाला शिकवू नये. राज ठाकरे यांना उशिरा उठून चिंतन करण्याची सवय आहे. त्यांनी स्वतःच्या मुलाचा पराभव का झाला? यावर बोलावे. अजित पवारांसारखे पहाटे 6 वा. उठून काम करावे, असे ते राज ठाकरे यांना टोला हाणताना म्हणालेत.

राज ठाकरेंची स्थिती गझनीच्या हिरोसारखी

सुरज चव्हाण म्हणाले, राज ठाकरे यांनी अजित पवारांवर बोलू नये. कारण, ते उठ दुपारी आणि घे सुपारीवाले नाहीत. राज ठाकरेंची स्थिती गझनी चित्रपटातील हिरोसारखी झाली आहे. त्यांना माझा सल्ला आहे की, त्यांनी भाषणाला येताना आपण 2009, 2014, 2019 व 2024 साली काय विधाने केली ते तपासून पहावे. ते त्यांना पुढील काळात भाषण करताना उपयोगी ठरेल. गझनीसारखे लगेच विसरण्यापेक्षा त्यांच्या लक्षात राहील.

अजित पवार पहाटे 6 वाजेपासून लोकांची कामे करतात. लोकांमध्ये जाऊन त्यांची कामे मार्गी लावतात. राज ठाकरे यांच्यासारखे दुपारी उठायचे व सुपारी घेऊन बोलायचे असे ते करत नाहीत. मनसेच्या आमदाराला त्याच्याच गावात केवळ 1 मत पडले. कदाचित तो एकच व्यक्ती त्या आमदाराने केलेल्या कामाचा लाभार्थी असेल. लोकांची कामे न करणारे निवडून कसे येतील? असेही ते यावेळी राज ठाकरे यांना टोला हाणताना म्हणाले.

राज ठाकरेंवर जनतेचा भरवसा नाही

एनसीपीचे नेते आनंद परांजपे यांनीही या प्रकरणी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, राज याची भूमिका कायमच बदलणारी राहिली आहे. त्यांचा पक्ष ऋतुसारखा आपली भूमिका बदलो. त्यांनी आपला पक्ष व चिन्ह राहिल की नाही याची चिंता करावी. त्यांना 128 जागा लढवून केवळ 1.55 टक्के मते मिळाली. त्यामुळे त्यांनी आमच्यावर बोलण्यापक्षा स्वतःच्या पक्षावर लक्ष द्यावे. महाराष्ट्रातील जनतेलाही मनसे व राज ठाकरे यांच्यावर भरवसा राहिला नाही. परिणामी, विधानसभेत त्यांचा एकही प्रतिनिधी राहिला नाही, असेही परांजपे म्हणाले. 

Tags:

Advertisement

Latest News

'लाडकी बहीण' योजनेसंदर्भात आता केवायसीचा नवीन नियम!  'लाडकी बहीण' योजनेसंदर्भात आता केवायसीचा नवीन नियम!
Ladki Bahin Yojna New Rule for KYC :  लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीचा हप्ता येण्याची लाडक्या बहिणी वाट बघत असतानाच, आता...
1 एप्रिलपासून वाहनधारकांसाठी 'हा' नवीन नियम लागू...!
महाकुंभाचा परिणाम; अयोध्येतील राम मंदिराने उत्पन्नाचे विक्रम मोडले!  
भरधाव स्कॉर्पिओ घुसली हॉटेलात; एकाचा मृत्यू, सात जण जखमी
'लव्ह जिहाद' कायद्याचे मुख्यमंत्री फ़डणवीसांनी केले समर्थन!
बिग NEWS : आयपीएल-2025चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर, कोणता संघ कोणासोबत लढणार!
शरद पवारांचा युवा आमदार अजित पवारांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात रंगली चर्चा!