अखेर मनोज जरांगेंचे उपोषण 6व्या दिवशी सुटले; म्हणाले- आता समोरासमोर लढाई करणार

भाजप आमदार सुरेश धस व खासदार बजरंग सोनवणे यांच्या हस्ते घेतले पाणी

On
अखेर मनोज जरांगेंचे उपोषण 6व्या दिवशी सुटले; म्हणाले- आता समोरासमोर लढाई करणार

मराठा आरक्षणासाठी रान पेटवणारे मनोज जरांगे यांनी सहाव्या दिवशी उपोषण स्थगित केले आहे. यापुढे उपोषण नाही, तर समोरासमोरची लढाई होईल, असा इशाराही त्यांनी सरकारला दिला.

तत्पूर्वी, भाजप आमदार सुरेश धस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी मनोज जरांगे यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी मनोज जरांगे यांनी केलेल्या 8 मागण्यांपैकी 4 मागण्यांवर सरकार सकारात्मक असल्याचे सुरेश धस यांनी सांगितले.

तर आम्ही मुंबईला जाण्याची तारीख निश्चित करू

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, या सरकारकडून आमच्या मागण्या होणार नसतील, तर आम्हाला मुंबईला जावेच लागेल, त्याची तारीख लवकरच घोषित करू, असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला.

मनोज जरांगेंच्या मागण्या काय?

  • न्यायमूर्ती शिंदे समिती पूर्ण बंद करण्यात आली होती. शिंदे समितीच्या मंत्रालयातील कार्यालयाला कुलूप लावले होते. शिंदे समितीने 57 लाख नोंदी शोधल्या. ती शिंदे समिती तत्काळ सुरू करायची आमची मागणी आहे. शिंदे समितीने किचकट अटी लावू नये. कागदपत्रांसाठी त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांना समजावून सांगा.
  • बंद पडलेली वंशावळ समिती गठीत करावी. पैसे न दिल्यामुळे मोडी लिपी अभ्यासक काम सोडून घरी गेले. त्यामुळे त्यासाठी निधी द्यावा, अशी मागणीही मनोज जरांगें यांनी केली.
  • राज्यातील मुलांवर झालेल्या केसेस सरसकट मागे घ्याव्यात, अशी मागणी करत आमच्या मुलांवर विनाकारण खोट्या केसेस केल्या आहेत, असे मनोज जरांगे म्हणाले.

Dhages

मनोज जरांगेंच्या कोणत्या मागण्या मान्य?

मनोज जरांगे यांनी 8 मागण्या मांडल्या होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 4 मागण्यांवर सकारात्मकता दाखवली आहे, असे सुरेश धस यांनी सांगितले.

  • कुणबी नोंदी शोधण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे समितीला एक वर्षाची मुदतवाढ देण्यासाठी मान्यता देण्याची कार्यवाही सुरू आहे. ती देण्यात येईल.
  • हैदराबाद गॅझेट तपासून न्यायमूर्ती शिंदे समितीकडून त्याबाबतचा अहवाल घेऊन उचित कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.
  • औंढ संस्थान, सातारा संस्थान आणि बॉम्बे गॅझेट याबाबतचा विषय क्लिअर होऊन येईल. त्याबाबतची कार्यवाही मुंबईत सुरू आहे. राज्याचे मुख्यमंत्री प्रचारासाठी दिल्लीत असले तरी, त्यांनी स्वत: सर्व प्रस्ताव मागवून घेऊन त्यावर मान्यता दिलेली आहे.
  • महाराष्ट्रातील मराठा आंदोलकांवर दाखल गुन्हे फक्त उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार व शासननिर्णयानुसार तपासून मागे घेण्याबाबत उचित कारवाई करण्यात येईल. आम्ही माघार घेतो, असे सरकारने मनाने जरी म्हटले, तरी हायकोर्ट त्याला परवानगी देत नाही. ज्यामध्ये 307, जाळपोळ किंवा गंभीर स्वरूपाचे गुन्हे वगळता बाकी माघार घेण्याबाबत सरकारने सकारात्मकता दाखवली आहे.
  • कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर स्थापन केलेल्या कक्षामार्फत कार्यवाही चालू राहील व त्यास गती देण्यात येईल, असे आश्वासन सरकारच्या वतीने देण्यात आल्याचे सुरेश धस यांनी सांगितले

मध्यरात्री आंतरवालीत घडोमोडी, धस-जरांगेंमध्ये तासभर चर्चा

दुसरीकडे, भाजप आमदार सुरेश धस यांनी बुधवारी मध्यरात्री मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेतली. दोघांमध्ये जवळपास दोन तास चर्चा झाल्याची माहिती आहे. या भेटींनतर मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे. सुरेश धस आणि मनोज जरांगे यांच्यात नेमकी काय चर्चा झाली, याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही.

सुरेश धस दोन दिवसांपूर्वी देखील मनोज जरांगे यांना भेटले होते. त्यावेळी त्यांच्या तब्येची विचारपूस करत उपचार घेण्याचा आग्रह केला होता. धस यांच्या आग्रहानंतर मनोज जरांगे यांनी उपचारास होकार देत सलाईन घेतले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागण्या मान्य करणार की नाही, अशी थेट विचारणा केली होती. तसेच काही दगाफटका झाल्यास पाच वर्षे सुखाने सत्तेत राहू देणार नाही, असा इशारा देखील दिला होता.

सुरेश धस काल मध्यरात्री देखील मनोज जरांगे यांच्या भेटीला गेल्याची माहिती मिळत आहे. या भेटीत दोघांमध्ये पाऊण ते पावणे दोन वाजेपर्यंत तासभर चर्चा झाल्याचे समजते. सुरेश धस आणि मनोज जरांगेंच्या चर्चेचा तपशील कळू शकला नाही. मात्र, दोघांमध्ये चर्चा झाल्यानंतर सकाळी मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाचे उपोषण थांबवण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. ते आज कोणत्याही क्षणी उपोषण थांबवण्याची घोषणा करू शकतात, अशी माहिती मिळत आहे.

'झक पक आंदोलन' करण्याचा मुख्यमंत्र्यांना इशारा

दरम्यान, मनोज जरांगे यांनी बुधवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत उपोषण थांबवण्याचा निर्णय घेतला होता. आता आनंद लय दिवस राहणार नाही, आनंदावर विरजण पडेल. ज्या दिवशी बोलायचे त्या दिवशी तुम्हाला सांगेन. खरी चूक कोणाची आहे, हे मराठा समाजाला कळाले आहे. बेइमानी आणि गद्दारी फडणवीस यांच्याकडून होईल असे वाटले नव्हते. जे हक्काचे आहे ते आरक्षण देत नाहीत. आम्हाला उपोषण करायचे नव्हते. आम्हाला वाटले, दोन दिवसात मागण्या पूर्ण होतील. फडणवीस यांनी मात्र चुप्पी मारली. मराठाविषयी किती द्वेष आणि आकस आहे दिसून आले. फडणवीस किती मराठा द्वेषी आहेत, ते उघडे पडले. आंदोलन सोडल्यानंतर सोडणार नाही, मी आता उपोषण करणार नाही. पण आता झक पक आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला होता.

ओबीसीमधूनच आरक्षण देण्यावर जरांगे ठाम मराठा आरक्षणसाठी मनोज जरांगे यांनी वर्षभरापासून लढा उभारला आहे. त्यांच्या आंदोलनानंतर सरकारने मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाला मंजुरी दिली, मात्र अजूनही मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे ठाम आहेत. मराठ्यांना सरसकट कुणबी जीआर काढून त्याचे तात्काळ वाटप करण्यात यावे. ज्या मराठ्यांची कुणबी नोंद निघाली, त्यांच्या सर्वच सगेसोयऱ्यांना कुणबी प्रमाण पत्र द्यावे, यांसह विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे 25 जानेवारीपासून आंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले होते. 

Tags:

Advertisement

Latest News

'लाडकी बहीण' योजनेसंदर्भात आता केवायसीचा नवीन नियम!  'लाडकी बहीण' योजनेसंदर्भात आता केवायसीचा नवीन नियम!
Ladki Bahin Yojna New Rule for KYC :  लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीचा हप्ता येण्याची लाडक्या बहिणी वाट बघत असतानाच, आता...
1 एप्रिलपासून वाहनधारकांसाठी 'हा' नवीन नियम लागू...!
महाकुंभाचा परिणाम; अयोध्येतील राम मंदिराने उत्पन्नाचे विक्रम मोडले!  
भरधाव स्कॉर्पिओ घुसली हॉटेलात; एकाचा मृत्यू, सात जण जखमी
'लव्ह जिहाद' कायद्याचे मुख्यमंत्री फ़डणवीसांनी केले समर्थन!
बिग NEWS : आयपीएल-2025चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर, कोणता संघ कोणासोबत लढणार!
शरद पवारांचा युवा आमदार अजित पवारांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात रंगली चर्चा!