काल झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर आज महाकुंभातील यात्रा परिसरात आग
अनेक पंडाल जळून राख, यापूर्वी 19 जानेवारीलाही लागलेल्या आगीत शेकडो दुकाने जळाली
MahaKumbh Mela-2025 : प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभात बुधवारी सकाळी चेंगराचेंगरी झाली. यात सुमारे तीस लोकांचा मृत्यू झाला आहे. तर नव्वद पेक्षा जास्त लोक यात गंभीर जखमी झालेले आहेत. या घटनेने प्रयागराजमध्ये काही काळ तणावाची स्थिती निर्माण झालेली होती. त्यानंतर दुपारी नऊ वाजेनंतर दिवसभर संगमात भाविकांनी स्नान केले. चेंगराचेंगरीची घटनेची तीव्रता काही प्रमाणात कमी होत नाही, तोच गुरुवारी पुन्हा महाकुंभ परिसरात मोठी दुर्घटना घडली आहे.
.jpeg)
महाकुंभ परिसरातील यात्रा परिसरातील पेंडालला आग लागल्याने अचानक भयावह स्थिती निर्माण झाली. आगीचे वृत्त कळताच घटनास्थळावर अग्निशमन दलाचे जवान बंबासह दाखल झाले. त्यांनी जागोजागी पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणण्याचे काम केले.
आग विझविण्यासाठी AWT, 50 अग्निशमन चौक्या तैनात
महाकुंभ नगरीत अग्निशमन कार्यासाठी प्रगत वैशिष्ट्यांसह 4 आर्टिक्युलेटिंग वॉटर टॉवर्स (LWT) तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये व्हिडिओ-थर्मल इमेजिंग सारख्या प्रगत प्रणाली आहेत. बहुमजली आणि उंच तंबूंमध्ये आग विझवण्यासाठी याचा वापर केला जातो. एलडब्ल्यूटी 35 मीटर उंचीपर्यंत आग विझवू शकते.
Dhages

महाकुंभमेळा परिसर अग्निमुक्त करण्यासाठी, येथे 350 हून अधिक अग्निशमन दल, 2000 हून अधिक प्रशिक्षित मनुष्यबळ, 50 अग्निशमन केंद्रे आणि 20 अग्निशमन चौक्या निर्माण करण्यात आल्या आहेत. रिंगण आणि तंबूंमध्ये अग्निसुरक्षा उपकरणे बसवण्यात आली आहेत.
#WATCH | Fire broke out in a few tents erected in an open area under the Chatnag Ghat Police Station area in Prayagraj today. The fire was doused and there was no casualty in the incident as per the Fire Department
— ANI (@ANI) January 30, 2025
Video source: UP Fire Department pic.twitter.com/23kKEVkRkl
19 जानेवारी रोजी 180 कॉटेज जळाल्या होत्या
महाकुंभाच्या जत्रा परिसरात 19 जानेवारी रोजी दुपारी 4.30 च्या सुमारास आग लागली होती. शास्त्री पुलाजवळ सेक्टर 19 येथील गीता प्रेसच्या कॅम्पमध्ये आग लागली. आगीत गीता प्रेसच्या 180 कॉटेज जळून खाक झाल्या. गीता प्रेसच्या किचनमध्ये छोट्या सिलेंडरमधून चहा बनवत असताना गॅस गळतीमुळे ही आग लागल्याचे महाकुंभ प्रशासनाकडून सांगण्यात आले. आगीमुळे किचनमध्ये ठेवलेले दोन गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
दहशतवादी संघटना म्हणाली- हा पिलीभीत चकमकीचा बदला
मंगळवारी दहशतवादी संघटना खलिस्तान जिंदाबाद फोर्सने मीडिया संघटनांना ई-मेल पाठवला. यामध्ये महाकुंभात स्फोट घडवून आणल्याचा दावा करण्यात आला होता. हा पिलीभीत चकमकीचा बदला आहे. त्याचा हेतू कोणाचेही नुकसान करण्याचा नव्हता. यूपीच्या मुख्यमंत्र्यांसाठी हा फक्त इशारा आहे. ही तर सुरुवात आहे. ई-मेलमध्ये फतेह सिंग बागी यांचे नाव लिहिले आहे. मात्र, यूपी पोलिसांनी खलिस्तान जिंदाबाद फोर्सचा दावा फेटाळून लावला आहे.
