सावधान! पुणे, सोलापुरानंतर मराठवाड्यातील 'या' जिल्ह्यांमध्येही आढळले GBSचे रुग्ण

आरोग्य प्रशासन अलर्ट, शासकीय रुग्णालयात सुरू आहेत तिघांवर उपचार

On
सावधान! पुणे, सोलापुरानंतर मराठवाड्यातील 'या' जिल्ह्यांमध्येही आढळले GBSचे रुग्ण

सर्वप्रथम राज्यातील पुणे येथे आढळलेला नवीन जीबीएस हा आजार आता सगळीकडे हात पाय पसरवत असून सध्या राज्यभरात गुलियन बॅरे सिंड्रोम म्हणजेच GBS या आजाराचा प्रादुर्भाव वाढत आहे. पुणे , नांदेड आणि सोलापूरनंतर आता छत्रपती संभाजीनगरमध्येही  या आजाराचे रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे.

छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात  GBS चे 3 रुग्ण आढळले असून, यामध्ये 2 महिला आणि एका 10 वर्षीय मुलीचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

पुण्यानंतर आता छत्रपती संभाजीनगर मध्येही GBS ने एन्ट्री केली असून घाटी रुग्णालयात दोन महिला आणि एका दहा वर्षीय मुलीला या आजाराची लागण झाली आहे आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मागील वर्षभरात घाटी रुग्णालयात GBS च्या रुग्णांवर उपचार केले असल्याची माहिती अधिष्ठाता  डॉक्टर शिवाजी सुक्रे  यांनी दिली. हा आजार कोरोनासारखा संसर्गजन्य  नसल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये, परंतु काळजी घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. या आजाराच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून, वेळ पडल्यास वेगळा विलगीकरण स्थापन करण्याची तयारी असल्याचे अधिष्ठातांनी सांगितले. दरम्यान, या आजाराची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पुण्यात सध्या GBS आजाराने दहशत निर्माण केली आहे. GBS च्या फैलावासाठी दूषित पाण्याचा स्त्रोत कारणीभूत मानला जात आहे. पुण्यातील नांदेडगाव  परिसरातही GBS चे रुग्ण आढळले आहेत. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन केंद्र सरकारच्या सात तज्ज्ञांचे पथक पुण्यात दाखल झाले असून त्यांनी पाहणी केली आहे. 

Dhages

सोलापुरातही GBS चे रुग्ण वाढत असून, त्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. GBS आजाराच्या पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिका अलर्ट मोडवर आली आहे. अचानकपणे हाता-पायात, अंगात अशक्तपणा जाणवत असेल किंवा कोणतीही लक्षणे आढळल्यास अंगावर न काढता त्वरित वैद्यकीय सल्लाघ्यावा. तसेच जास्त काळ आलेला ताप , खोकला , उलट्या , असा त्रास झाल्यास त्वरित आरोग्य केंद्रात चाचण्या करून घ्याव्यात, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. वैद्यकीय सल्ल्याशिवाय कोणतेही औषधोपचार न घेण्याचे आवाहन सोलापूर महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे. GBS हा आजार संसर्गजन्य नसल्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, मात्र सतर्क राहावे, अशा सूचना महानगरपालिका आरोग्य अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

 योग्य काळजी घेतल्यास GBS आजारापासून आपण दूर राहू शकतो, असे तज्ञ सांगतात.बाहेरचे खाद्यपदार्थ  खाल्ल्यास, तसेच बाहेरचे पाणी प्यायल्यास GBS ची लागण होण्याची शक्यता जास्त असते. या आजारात अशक्तपण, थकवा जाणवणे, शिवाय श्वास घेण्यास त्रास होणे अशी काही लक्षणे आहेत.  मात्र योग्य औषधोपचार केल्यास GBS टाळता येऊ शकतो, असेही डॉक्टरांनी सांगितले आहे.

GBS चा वाढता धोका लक्षात घेता, नागरिकांनी सतर्क राहणे, स्वच्छता राखणे, बाहेरचे खाणे-पिणे टाळणे आणि लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

Tags:

Advertisement

Latest News

'लाडकी बहीण' योजनेसंदर्भात आता केवायसीचा नवीन नियम!  'लाडकी बहीण' योजनेसंदर्भात आता केवायसीचा नवीन नियम!
Ladki Bahin Yojna New Rule for KYC :  लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीचा हप्ता येण्याची लाडक्या बहिणी वाट बघत असतानाच, आता...
1 एप्रिलपासून वाहनधारकांसाठी 'हा' नवीन नियम लागू...!
महाकुंभाचा परिणाम; अयोध्येतील राम मंदिराने उत्पन्नाचे विक्रम मोडले!  
भरधाव स्कॉर्पिओ घुसली हॉटेलात; एकाचा मृत्यू, सात जण जखमी
'लव्ह जिहाद' कायद्याचे मुख्यमंत्री फ़डणवीसांनी केले समर्थन!
बिग NEWS : आयपीएल-2025चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर, कोणता संघ कोणासोबत लढणार!
शरद पवारांचा युवा आमदार अजित पवारांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात रंगली चर्चा!