'डॉन-3' या चित्रपटात आता अभिनेता विक्रांत मेसीची एन्ट्री!
खलनायकाच्या भूमिकेत दिसणार: रणवीरसोबत दुसऱ्यांदा स्क्रिन शेअर करणार
'12 वी फेल', 'द साबरमती रिपोर्ट'या चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या अभिनेता विक्रांत मेस्सीची 'डॉन -3' या चित्रपटात वर्णी लागली आहे. विक्रांत मेस्सीची वर्णी फिल्म इंडस्ट्रीमधील सर्वात मोठ्या फ्रेंचायझीच्या चित्रपटात लागली आहे. डॉन 3 चित्रपटात मेस्सी खलनायकाच्या रुपात दिसणार आहे.
.jpeg)
काही दिवसांपूर्वी फिल्म इंडस्ट्रीतून सोडणार असं वक्तव्य करून विक्रांत मेसी खूप चर्चेत आला होता. परंतु काही दिवसानंतरच त्यांनी त्याच्या वक्तव्याबद्दल यू टर्न घेतले होते. विक्रात मेस्सी आता डॉन फ्रेंचायझीच्या आगामी चित्रपटात झळकणार आहे. डॉन 3 चित्रपटात आता विक्रांत मेस्सीची एन्ट्री झाली आहे. डॉन 3 मध्ये विक्रांत व्हिलनच्या भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी समोर आलं होतंकी, फरहान अख्तरच्या डॉन 3 चित्रपटात विक्रांत मेस्सीची वर्णी लागू शकते. आता या बातमीवर शिक्कामोर्तब झाला आहे. विक्रांत मेस्सी डॉन 3 मध्ये खलनायकाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंह मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 'डॉन 3' मध्ये अभिनेता रणवीर सिंह याच्याविरोधात अभिनेता विक्रांत मेस्सी झळकणार आहे. या चित्रपटात विक्रांत मेस्सी एका शक्तिशाली आणि धोकादायक खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. विक्रांतचं पात्र रणवीर सिंहच्या 'डॉन' पात्राला कठोर आव्हान देईल. डॉन 3 मध्ये विक्रांत मेस्सीची वर्णी लागल्याची अधिकृत घोषणा निर्माते लवकरच करू शकतात. ही बातमी समोर आल्यानंतर, यानंतर विक्रांतचे चाहते खूप उत्सुक आहेत. त्याला नवीन भूमिकेत पाहण्यासाठी खूपच उत्सुक आहेत.
Dhages

शाहरुख खानच्या जागी रणवीर सिंह
'डॉन 3' चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी फरहान अख्तरवरआहे, यापूर्वी त्याने 'डॉन' फ्रँचायझीचे दोन्हीचित्रपट दिग्दर्शित केले आहेत. डॉन ही बॉलिवूडची सुपरहिट फ्रेंचायझी आहे, त्यामुळे डॉन 3 चित्रपटाकडून चाहत्यांना खूप अपेक्षा आहेत. शाहरुख खाननंतर आता रणवीर सिंह ही डॉनची भूमिका साकारत फ्रेंचायझी पुढे नेत आहे. या चित्रपटात रणवीरसोबत कियारा अडवाणीची भूमिकेत दिसणार आहे. कियारा पहिल्यांदाच या मोठ्या अॅक्शन-थ्रिलर चित्रपटात दिसणार आहे.लवकरच डॉन 3 चित्रपटाचे चित्रीकरण सुरू करण्यात येणार आहेत आणि रणवीरचा फर्स्ट लूकही समोर आला आहे.
अभिनेता विक्रांत मेस्सीने अलीकडेच 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटात झळकला होता. या चित्रपटातील त्यांच्या उत्कृष्ट अभिनयाचं सर्वत्र कौतुक झालं. '12वी फेल' चित्रपटातून त्याला खरी ओळख मिळाली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटात त्याने बिहारमधील एका गरीब मुलाची संघर्षकथा अतिशय प्रभावीपणे मांडली आहे.
