प्रेक्षकांसाठी मेजवानी! लवकरच ओटीटी वरती देखील येतोय 'पुष्पा 2'!

बॉक्स ऑफिसवर केली पुष्पाने केली छप्परफाड कमाई, आकडा वाचून व्हाल थक्क!

On
प्रेक्षकांसाठी मेजवानी! लवकरच ओटीटी वरती देखील येतोय 'पुष्पा 2'!

'पुष्पा -2' हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून ओटीटी वरती येणार अशा चर्चा होत्या परंतु तो काही ओटीटी वरती प्रदर्शित झाला नव्हता. पण आता अल्लू अर्जुन च्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चाहते 'पुष्पा 2' च्या OTT रिलीज डेटची प्रतीक्षा करत आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर छप्पर फाड कमाई केली आणि प्रचंड कलेक्शन केले आहे. दरम्यान, निर्माते आता हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याची तयारी करत आहेत. मात्र, चित्रपटाच्या रिलीजमध्ये एक ट्विस्ट आहे, ज्यामुळे हिंदी दर्शक नाराज होऊ शकतात.

'पुष्पा 2' चे रीलोडेड व्हर्जन OTT वर होणार रिलीज

ब्लॉकबस्टर 'पुष्पा 2' चे रीलोडेड व्हर्जन 17 जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाले. त्यानंतर, आता 30 जानेवारीपासून हा चित्रपट लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्म Netflix वर स्ट्रीम केले जाईल. ओटीटी प्लॅटफॉर्मने त्यांच्या अधिकृत एक्स म्हणजेच आधीचे ट्विटर हँडलवर एक पोस्टर जारी करून ही बातमी शेअर केली आहे.

या पोस्टमध्ये, "द मॅन, द मिथ, द ब्रँड अँड. पुष्पा का रुल फिरसे शुरु होनेवाला है!"पुष्पा 2 - रीलोडेड व्हर्जन Netflix वर 23 मिनिटांच्या अतिरिक्त फुटेजसह पहा, जो लवकरच तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत रिलीज होणार आहे!" पोस्टमध्ये स्ट्रीमिंगची तारीख स्पष्टपणे जाहीर केलेली नसली तरी, त्यात प्लॅटफॉर्मच्या "न्यू अँड द" चा उल्लेख आहे. 'हॉट' विभागात 30 जानेवारी ही अधिकृत प्रकाशन तारीख दिसत आहे.

Dhages

'पुष्पा 2: द रुल' ने जगभरात 1800 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई करून इतिहास रचला आहे. रश्मिका मंदान्ना, फहाद फासिल, जगपती बाबू, राव रमेश, अनसूया भारद्वाज आणि सुनील यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट दोन महिन्यांनंतरही प्रेक्षकांना OTT वर आकर्षित करण्यात यशस्वी झाला आहे. त्यामुळे प्रेक्षक ही पर्वणी नक्कीच चुकवणार नाहीत. 

Tags:

Advertisement

Latest News

'लाडकी बहीण' योजनेसंदर्भात आता केवायसीचा नवीन नियम!  'लाडकी बहीण' योजनेसंदर्भात आता केवायसीचा नवीन नियम!
Ladki Bahin Yojna New Rule for KYC :  लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीचा हप्ता येण्याची लाडक्या बहिणी वाट बघत असतानाच, आता...
1 एप्रिलपासून वाहनधारकांसाठी 'हा' नवीन नियम लागू...!
महाकुंभाचा परिणाम; अयोध्येतील राम मंदिराने उत्पन्नाचे विक्रम मोडले!  
भरधाव स्कॉर्पिओ घुसली हॉटेलात; एकाचा मृत्यू, सात जण जखमी
'लव्ह जिहाद' कायद्याचे मुख्यमंत्री फ़डणवीसांनी केले समर्थन!
बिग NEWS : आयपीएल-2025चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर, कोणता संघ कोणासोबत लढणार!
शरद पवारांचा युवा आमदार अजित पवारांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात रंगली चर्चा!