महाकुंभातील चेंगराचेंगरीबाबत मोठी अपडेट : मृतांचा आकडा वाढला, 30 जणांचा झाला मृत्यू
प्रशासनाने जारी केला मृतांचा आकडा, जाणून घ्या किती जणांची ओळख पटली, अन् दिवसभरात काय काय घडलं
maha kumbh mela stampede : महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत मोठी अपडेट समोर आली आहे. बुधवारी पहाटे प्रयागराज येथील महाकुंभातील चेंगराचेंगरीत किमान 30 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 25 जणांची ओळख पटली असून उर्वरित 5 जणांची ओळख पटवली जात आहे, अशी माहिती डीआयजी महाकुंभ, वैभव कृष्णा यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
.jpeg)
नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रयागराज येथील घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, दुःखद अपघातात आपण काही लोक गमावले आहेत आणि अनेक लोक जखमी झाले आहेत. मी पीडित कुटुंबांप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो. जखमींच्या लवकर पुनर्प्राप्तीसाठी मी प्रार्थना करतो. मी उत्तर प्रदेश सरकारच्या सतत संपर्कात आहे. आज कोट्यवधी भाविक तिथे पोहोचले आहेत, काही काळासाठी स्नान प्रक्रिया खंडित झाली होती, परंतु आता लोक सुरळीतपणे स्नान करत आहेत.
Dhages

महाकुंभात चेंगराचेंगरीची अत्यंत दुःखद बातमी - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, प्रयागराज महाकुंभातील चेंगराचेंगरीची घटना अत्यंत दुःखद आहे. जखमी भाविकांच्या कुटुंबियांप्रती मी माझ्या संवेदना व्यक्त करते आणि सर्व जखमी भाविकांच्या लवकर पुनर्प्राप्तीसाठी देवाकडे प्रार्थना करते.
Prayagraj, UP: 30 people have lost their lives in the Maha Kumbh stampede that took place between 1-2 AM. 25 people have been identified and the identification of the remaining 5 is being done: DIG Mahakumbh, Vaibhav Krishna pic.twitter.com/9CqHORT0wt
— ANI (@ANI) January 29, 2025
#WATCH | Lucknow | Uttar Pradesh CM Yogi Adityanath says," The situation in Prayagraj is under control..."
— ANI (@ANI) January 29, 2025
"Around 8-10 crore devotees are present in Prayagraj today. There is continuous pressure due to the movement of devotees towards the Sangam Nose. A few devotees have… pic.twitter.com/lOc1OIraqm
बॅरिकेड तुटल्यानंतर चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली- ओएसडी आकांक्षा राणा
कुंभमेळ्याच्या ओएसडी आकांक्षा राणा म्हणाल्या, "बॅरिकेड नाक्यावरील अडथळा तुटल्यानंतर चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. या घटनेत काही लोक जखमी झाले आहेत, ज्यांवर उपचार सुरू आहेत.
