'मृत्यूनंतर काय होते' ऑनलाईन सर्च केले, त्यानंतर केली आत्महत्या

नागपूरातील घटनेने महाराष्ट्र हादरला, 17 वर्षीय युवतीने असे टोकाचे पाऊल का उचलले

On
 'मृत्यूनंतर काय होते' ऑनलाईन सर्च केले, त्यानंतर केली आत्महत्या

नागपुरात एका 17 वर्षीय मुलीने 'मृत्यूनंतर काय होते' हे ऑनलाइन शोधून आत्महत्या केल्याची कथित घटना समोर आली आहे. धंतोली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, 17 वर्षीय मुलीने प्रथम तिचे मनगट चाकूने कापले आणि 'स्टोन ब्लेड चाकू'ने क्रॉस मार्क केले. यानंतर गळा चिरून आत्महत्या केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खोलीतून जप्त केलेला चाकू नागपुरात मिळत नाही.तर चाकू ऑनलाइन मागवला असावा. सायबर पोलिस मोबाइलचाही तपास करत आहेत.

जाणून घ्या संपूर्ण घटना...

  • रविवारी रात्री ही घटना घडली. सोमवारी पहाटे 5.45 वाजता तिची आई तिला उठवण्यासाठी खोलीत गेली तेव्हा ती बेडवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. हे पाहून आई ओरडली. आवाज ऐकून वडीलही खोलीत पोहोचले.
  • यानंतर धंतोली पोलिस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मोबाईल ताब्यात घेऊन त्याची तपासणी केली असता ती गुगलवर 'मृत्यूनंतर काय होते' याची माहिती शोधत असल्याचे आढळून आले. पोलिसांना एक डायरीही सापडली आहे.
  • मुलीला युरोपियन संस्कृतीत रस असल्याचे पोलिसांना डायरीतून समजले. तीने आपल्या डायरीमध्ये परदेशी संस्कृतींबद्दल लेखन केले. ती काही काळ मृत्यूवर संशोधनही करत होती.

Dhages

काही महिन्यांपूर्वीच हे कुटुंब नागपुरात स्थलांतरित झाले

मृत मुलगी ही एका खासगी शाळेतील बारावीची विद्यार्थी होती. तीला 10 ते 12 परदेशी भाषाही अवगत होत्या. ती अभ्यासात खूप हूशार होती.

तीने कुटुंब काही महिन्यांपूर्वीच नागपुरात आले होते. ती आपल्या आई-वडिलांसोबत छत्रपती नगर परिसरात राहत होती आणि त्यांची एकुलती एक मुलगी होती.

तिचे वडील नागपुरात आरबीआयचे प्रादेशिक संचालक आहेत. ती तिच्या आई-वडिलांसोबत घराच्या खाली असलेल्या खोलीतच राहत होती. त्याच्या मामाचे कुटुंब आणि आजी पहिल्या मजल्यावर राहते.

विद्यार्थी आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर

एका अहवालानुसार विद्यार्थी आत्महत्येच्या बाबतीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. मध्य प्रदेश दुसऱ्या तर तामिळनाडू तिसऱ्या क्रमांकावर आहे. राजस्थानमधील कोटा येथे विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या बातम्या वारंवार येत आहेत. पण अहवालानुसार राजस्थान या बाबतीत दहाव्या स्थानावर आहे.

  •  
Tags:

Advertisement

Latest News

'लाडकी बहीण' योजनेसंदर्भात आता केवायसीचा नवीन नियम!  'लाडकी बहीण' योजनेसंदर्भात आता केवायसीचा नवीन नियम!
Ladki Bahin Yojna New Rule for KYC :  लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीचा हप्ता येण्याची लाडक्या बहिणी वाट बघत असतानाच, आता...
1 एप्रिलपासून वाहनधारकांसाठी 'हा' नवीन नियम लागू...!
महाकुंभाचा परिणाम; अयोध्येतील राम मंदिराने उत्पन्नाचे विक्रम मोडले!  
भरधाव स्कॉर्पिओ घुसली हॉटेलात; एकाचा मृत्यू, सात जण जखमी
'लव्ह जिहाद' कायद्याचे मुख्यमंत्री फ़डणवीसांनी केले समर्थन!
बिग NEWS : आयपीएल-2025चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर, कोणता संघ कोणासोबत लढणार!
शरद पवारांचा युवा आमदार अजित पवारांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात रंगली चर्चा!