'सॅनटरी पॅड'वरुन सासूने सुनेशी केले भांडण; सुनेने आईला व्हिडिओ कॉल करून जीवन संपवले

नवरा सासूचीच बाजू घेऊन करत होता मारहाण; अखेर अभियंता तरुणीने उचलले टोकाचे पाऊल, वाचा दर्दनाक कहाणी

On
'सॅनटरी पॅड'वरुन सासूने सुनेशी केले भांडण; सुनेने आईला व्हिडिओ कॉल करून जीवन संपवले

मुलगी कितीही शिकली, मोठ्या पदावर गेली. तरी देखील तिच्याबद्दल समाजात बघण्याचा दृष्टीकोण वेगळाच आहे. उच्चशिक्षित सुनेला सासू व नवऱ्याने सातत्याने त्रास दिल्याने अखेर त्रस्त सुनेने टोकाचे पाऊल उचलले आहे. अर्थात जीवनयात्रा संपविण्याआधी झालेले भांडण अतिशय क्षुल्लक होेते. पण यात एका तरुणीचा बळी गेला. 

मासिक पाळी सुरू असताना ‘सॅनिटरी पॅड’ वरून सासूने वाद घातल्याने नवविवाहित अभियंता सुनेने आईला व्हिडिओ कॉल करून गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना नागपुरात घडली.  अश्विनी भावेशकुमार बादुले (२४) असे मृत तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी तिचा पती भावेशकुमार याला अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत अश्विनी (वय- २४, रा. पारडी) आणि भावेशकुमार प्रेमचंद बादुले (वय-३२) दोघेही अभियंता असून एका मोठ्या स्टील कंपनीत नोकरीवर होते. नोकरीच्या ठिकाणी दोघांची ओळख झाली. दोघांमध्ये नंतर प्रेमही झाले. दोघांनीही प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतला. मात्र, अश्विनीच्या घरचे यासाठी तयार नव्हते. मात्र, भावेशकुमारने तिला कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन लग्न करण्यासाठी तयार केले. जून 2024 मध्ये दोघांनी प्रेमविवाह केला.

भावेशने अश्विनीस नोकरी सोडण्यास भाग पाडले

नवविवाहित सून घरी आली आणि घरात रमली. नंतर त्यांच्या प्रेमविवाहाला माहेरूनही स्वीकाण्यात आले. मात्र, प्रेमविवाहाला विरोध केल्यामुळे चिडलेला भावेश अश्विनीला आई-वडिलांसह भावाशी बोलण्यास मनाई करत होता. लग्न झाल्यानंतर भावेशने अश्विनीला नोकरी सोडण्यास सांगितले. सुरुवातीला तिने नकार दिला, परंतु संसार वाचवण्यासाठी तिने नोकरीचा राजीनामा दिला. दोघांचाही संसार व्यवस्थित सुरू होता. मात्र, त्यानंतर दोघांत वाद होण्यास सुरुवात झाली.

Dhages

सासू-पतीचा त्रास असह्य होतोय म्हणत पाठवल्या व्हाॅइस नोट्स

अश्विनीने आईला व्हिडिओ कॉल केला. घरात वाद झाल्याचे सांगितले. ‘आई… सासू-पतीचा त्रास मला अगदी असह्य होत आहे. मला जगायची इच्छा नाही.’ असे म्हणून फोन ठेवला.  सासूने दिलेल्या त्रासाबाबत काही मेसेज आईला पाठवले. काही ‘व्हाॅइस नोट्स’सुद्धा आईला पाठवल्या.

सासू मंदिरात गेल्यानंतर अश्विनीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. रात्री पती घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी पत्नीला आत्महत्येस प्रवृत केल्याचा गुन्हा दाखल करून पतीला अटक केली.

आईची बाजू घेत भावेशची अश्विनीला मारहाण

मासिक पाळीमुळे अश्विनीने बाथरूममध्ये ‘सॅनिटरी पॅड’ ठेवले. त्यामुळे सासू तिच्यावर रागावली. तिने ते पॅड कचऱ्याच्या डब्यात टाकले. त्यावरूनही सासूने सुनेशी वाद घातला. तसेच पॅड लगेच बाहेर फेकण्यास बजावले. पती भावेशने आईची बाजू घेत तिला मारहाण केली आणि नोकरीवर निघून गेला. त्यानंतर तिने टोकाचे पाऊल उचलले.  

Tags:

Advertisement

Latest News

'लाडकी बहीण' योजनेसंदर्भात आता केवायसीचा नवीन नियम!  'लाडकी बहीण' योजनेसंदर्भात आता केवायसीचा नवीन नियम!
Ladki Bahin Yojna New Rule for KYC :  लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीचा हप्ता येण्याची लाडक्या बहिणी वाट बघत असतानाच, आता...
1 एप्रिलपासून वाहनधारकांसाठी 'हा' नवीन नियम लागू...!
महाकुंभाचा परिणाम; अयोध्येतील राम मंदिराने उत्पन्नाचे विक्रम मोडले!  
भरधाव स्कॉर्पिओ घुसली हॉटेलात; एकाचा मृत्यू, सात जण जखमी
'लव्ह जिहाद' कायद्याचे मुख्यमंत्री फ़डणवीसांनी केले समर्थन!
बिग NEWS : आयपीएल-2025चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर, कोणता संघ कोणासोबत लढणार!
शरद पवारांचा युवा आमदार अजित पवारांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात रंगली चर्चा!