एकीकडे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, तर अजित पवार 30 तारखेला बीडमध्ये घेणार बैठक

पालकमंत्रीपदाची जबाबदारी घेतल्यानंतर अजित दादा प्रथमच बीडमध्ये येणार

On
एकीकडे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, तर अजित पवार 30 तारखेला बीडमध्ये घेणार बैठक

राज्यात एकीकडे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने राजकारणाला वेग आलाय. अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा यासाठी राजकीय दबाव वाढत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार गुरुवारी (30 जानेवारी) बीडमध्ये येणार आहेत. 

बीडच्या पालकमंत्रीपदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार बीडमध्ये येणार आहेत .  येत्या 30 जानेवारीला अजित पवारांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार आहे. 

बीड जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून संतोष देशमुख हत्या प्रकरण चांगलेच चिघळले आहे . या हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे आर्थिक व्यवहार असल्याचा आरोप होत आहे.

खंडणी ते खून प्रकरण या संपूर्ण घटनाक्रमात धनंजय मुंडेच सूत्रधार असून त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी होत आहे . दुसरीकडे महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासावर भाजप आमदार सुरेश धस यांनी बोट ठेवल्यानंतर तपासाला वेग आलाय.

या सगळ्या घटना घडत असताना पालकमंत्री पदाचा कारभार स्वीकारल्यानंतर अजित पवार बीडमध्ये येणार आहेत. या पार्श्वभूमीवर ते काय बोलतात, आढावा बैठकीत काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे.

Dhages

अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली बीडमध्ये आढावा बैठक

येत्या 30 जानेवारीला बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार आहे .या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक देखील पार पडली . बीडच्या पालकमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री अजित पवार बीडमध्ये येणार आहेत.

विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आढावा बैठक होणार आहे. 30 जानेवारी रोजी सकाळी 10:00 वाजता ही बैठक होईल. या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली.

अजित पवारांचा बीड दौरा महत्त्वाचा

प्रत्येक विभागाचे प्रस्ताव किती, प्रलंबित किती? प्रलंबित राहण्याची कारणे यावर चर्चा करण्यात आली . दरम्यान 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा अर्थसंकल्प सादर करतील . या संदर्भात राज्यात बैठकांचा सपाटा सुरू असून राज्य अर्थमंत्री अजित पवार यांचा बीड दौरा महत्त्वाचा समजला जात आहे. 

Tags:

Advertisement

Latest News

'लाडकी बहीण' योजनेसंदर्भात आता केवायसीचा नवीन नियम!  'लाडकी बहीण' योजनेसंदर्भात आता केवायसीचा नवीन नियम!
Ladki Bahin Yojna New Rule for KYC :  लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीचा हप्ता येण्याची लाडक्या बहिणी वाट बघत असतानाच, आता...
1 एप्रिलपासून वाहनधारकांसाठी 'हा' नवीन नियम लागू...!
महाकुंभाचा परिणाम; अयोध्येतील राम मंदिराने उत्पन्नाचे विक्रम मोडले!  
भरधाव स्कॉर्पिओ घुसली हॉटेलात; एकाचा मृत्यू, सात जण जखमी
'लव्ह जिहाद' कायद्याचे मुख्यमंत्री फ़डणवीसांनी केले समर्थन!
बिग NEWS : आयपीएल-2025चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर, कोणता संघ कोणासोबत लढणार!
शरद पवारांचा युवा आमदार अजित पवारांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात रंगली चर्चा!