दीडशे ते दोनशे पोलिस 'आका'वर प्रेम करणारे; भाजप आमदार सुरेश धस यांचा दावा 

म्हणाले- संबंधित पोलिसांची यादी मुख्यमंत्र्यांना देणार, मराठवाड्यातून हद्दपारीची मागणी 

On
दीडशे ते दोनशे पोलिस 'आका'वर प्रेम करणारे; भाजप आमदार सुरेश धस यांचा दावा 

Suresh Dhas on Valmik Karad and police relations : बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख प्रकरणात आता सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी देखील उडी घेतली आहे. बीडमधील 26 पोलिस अधिकारी हे वाल्मीक कराडच्या मर्जीतील असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच वाल्मीक कराडच्या मर्जीतले पोलिस अधिकाऱ्यांची बीडमधून बदली करण्याची देखील त्यांनी मागणी केली आहे. तृप्ती देसाई यांच्या आरोपावर आमदार सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली. 

सुरेश धस म्हणाले देसाईंना सांगितलेला आकडा फार कमी 

एका वृत्तवाहिनीशी बोलताना आमदार सुरेश धस म्हणाले, तृप्ती देसाई यांनी सांगितलेला 26 हा फार कमी आकडा आहे. सर्व कर्मचारी पोलिस अधिकारी यांची जर बेरीज केली तर ती 200 इतकी होईल. मी लवकरच यादी करणार आहे आणि मुख्यमंत्र्यांना देणार आहे, असे सुरेश धस म्हणाले आहेत.

सुमारे दीडशे ते दोनशे पोलिस अधिकारी आकाचे खास 

सुरेश धस म्हणाले, फक्त 26 नाही तर 150 ते 200 अधिकारी हे वाल्मीक कराडच्या मर्जीतले असतील. तृप्ती देसाई यांनी 26 हा फार कमी आकडा सांगितला आहे. सर्व पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बेरीज केली तर 200 इतकी होईल. त्यांनी हा आकडा कमी सांगितला आहे. मी लवकरच या सर्वांची यादी मुख्यमंत्र्यांना देणार आहे. या सर्वांची बदली बीडच्या बाहेर नव्हे तर मराठवाड्याच्या बाहेर करावी, असेही मी त्यांना सांगणार आहे.

Dhages

पुढे बोलताना सुरेश धस म्हणाले, आकाचे पोलिस दलातील जे प्रेमी आहेत. आतापर्यंत एसपींनी पोलिस दलातच कसे ठेवले. मी कितीतरी वेळा याबद्दल बोललो आहे. महादेव मुंडेचे आरोपी आकाच्या मुलाच्या अवतीभवती फिरत होते. ते लगेच गायब झाले. त्या डीवायएसपी यांनी देखील अजून चार्ज घेतला नाही. ते सुद्धा आकाचेच आहेत, असा आरोप सुरेश धस यांनी केला आहे.

सुरेश धस म्हणाले, महादेव मुंडेचे आरोपी सापडले पाहिजेत. ते 15 दिवसांच्या आत जेलमध्ये गेले पाहिजेत. त्याची हत्या होऊन 15 महीने झाले. अतिशय निर्घृण हत्या झाली. कॉलेजच्या ग्राऊंडमध्ये मारण्यात आले. त्यानंतर तहसीलदाराच्या दारात नेऊन टाकण्यात आले. एसपींनी ज्या पद्धतीने यंत्रणा हलवायला हवी, तशी यंत्रणा हलवली जात नाही, असेही सुरेश धस म्हणाले.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी डॉक्टरांवर केलेल्या आरोपांवर भाष्य करताना सुरेश धस म्हणाले, डॉ. अशोक थोरात हा चांगला माणूस आहे. अंजली दमानिया यांनी चुकीची माहिती दिली. डॉक्टरांचीही चौकशी करावी लागेल. संतोष देशमुखांचा पोस्टमॉर्टम रीपोर्ट हा अतिशय क्लियर आहे. संतोष देशमुखांचे डोळे जाळलेले नव्हते हे आम्हीही मान्य करतो. पण त्यांना मारहाण केलेली होती. मला ही सर्व माहिती मिळाली. त्यानंतर मग माझा संताप झाला. मी हा विषय सभागृहात मांडला आणि मी त्या भूमिकेवर आजही ठाम आहे, उद्याही असेन, असे धस यांनी म्हंटले आहे.  

Tags:

Advertisement

Latest News

'लाडकी बहीण' योजनेसंदर्भात आता केवायसीचा नवीन नियम!  'लाडकी बहीण' योजनेसंदर्भात आता केवायसीचा नवीन नियम!
Ladki Bahin Yojna New Rule for KYC :  लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीचा हप्ता येण्याची लाडक्या बहिणी वाट बघत असतानाच, आता...
1 एप्रिलपासून वाहनधारकांसाठी 'हा' नवीन नियम लागू...!
महाकुंभाचा परिणाम; अयोध्येतील राम मंदिराने उत्पन्नाचे विक्रम मोडले!  
भरधाव स्कॉर्पिओ घुसली हॉटेलात; एकाचा मृत्यू, सात जण जखमी
'लव्ह जिहाद' कायद्याचे मुख्यमंत्री फ़डणवीसांनी केले समर्थन!
बिग NEWS : आयपीएल-2025चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर, कोणता संघ कोणासोबत लढणार!
शरद पवारांचा युवा आमदार अजित पवारांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात रंगली चर्चा!