हिवाळ्यात होत असलेला सांधेदुखीचा त्रास कसा करावा दूर , वाचा सविस्तर

On
हिवाळ्यात होत असलेला सांधेदुखीचा त्रास कसा करावा दूर , वाचा सविस्तर

वंदना वेदपाठक : साधारणपणे थंडीचा महिना सुरू झाला की बऱ्याच जणांना सांधेदुखीचा त्रास जाणवतो.हिवाळ्यात सांध्यांमधील द्रव अधिक घट्ट होतात आणि त्यामुळे सांध्यांमध्ये कडकपणा येतो आणि वेदना सुरू होतात. ज्यांना संधिवाताची समस्या आहे त्यांना याचा अधिक त्रास होऊ शकतो. अनेकांना गुडघे, कोपर किंवा मनगट यासारख्या विविध भागात वेदना आणि अस्वस्थता जाणवू लागतात. तापमानात अचानक घट झाल्यामुळे सांध्यातील रक्तप्रवाह कमी होऊ शकतो, ज्यामुळे ते वेदनांबाबत अधिक संवेदनशील होतात. 

 सांध्यांमधील जडपणा, सूज, असह्य वेदना आणि हालचाल मंदावणे अशी काही सांधेदुखीची लक्षणे आढळून येतात, ज्यामुळे दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ शकतो. अशा वेळी काही गोष्टींची काळजी घेऊन हा त्रास दूर ठेवता येऊ शकतो, असे तज्ज्ञ सांगतात. हिवाळ्यात वातावरणातील थंडपणामुळे सांध्यांमध्ये ताठरता येऊ शकते आणि यामुळे वेदना होतात. अशा व्यक्तींना उबदार कपडे घालण्याचा सल्ला दिला जातो जे सांधे उबदार ठेवण्यास मदत करतात.  हीटिंग पॅड चा ही वापर  आपण करू शकता किंवा गरम पाण्याने आंघोळ करू शकता. परंतु, पाणी जास्त गरम नसावं याची खात्री करा. कारण, ते तुमच्या त्वचेसाठी हानिकारक ठरू शकते.

नियमितपणे व्यायाम करणे होईल फायदेशीर-: हिवाळ्यात व्यायामाची योग्य दिनचर्या राखणे उपयुक्त ठरू शकते. सांध्यांना उबदार राखण्यासाठी विविध शारीरिक क्रिया आणि व्यायाम करा. यामध्ये स्ट्रेचिंग, रनिंग, जॉगिंग, सायकलिंग, डान्सिंग, योगा, मेडिटेशन, कार्डिओ आणि जिम यासारख्या व्यायामांचा समावेश असू शकतो. हे रक्ताभिसरण सुधारण्यास आणि तुमचे सांधे लवचिक राखण्यास.मदत करतात.

 जास्त वजन तुमच्या सांध्यावर जास्त दाब आणू शकते, विशेषत: गुडघे, नितंब आणि पाठीच्या खालच्या भागात जास्त दाब आल्याने ते वेदनादायक ठरू शकते. योग्य आहार आणि नियमित व्यायाम हे तुमचे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करू शकतात.

 हिवाळ्यात सांधेदुखीपासून बचाव करण्याची गुरूकिल्ली म्हणजे संतुलित आहाराचे सेवन. तुमच्या रोजच्या जेवणात हळद, आले आणि लसूण यांसारख्या मसाल्यांसोबत पालक, ब्रोकोली आणि रताळे यांसारख्या पदार्थांचा समावेश असावा.

Tags:

Advertisement

Latest News

'लाडकी बहीण' योजनेसंदर्भात आता केवायसीचा नवीन नियम!  'लाडकी बहीण' योजनेसंदर्भात आता केवायसीचा नवीन नियम!
Ladki Bahin Yojna New Rule for KYC :  लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीचा हप्ता येण्याची लाडक्या बहिणी वाट बघत असतानाच, आता...
1 एप्रिलपासून वाहनधारकांसाठी 'हा' नवीन नियम लागू...!
महाकुंभाचा परिणाम; अयोध्येतील राम मंदिराने उत्पन्नाचे विक्रम मोडले!  
भरधाव स्कॉर्पिओ घुसली हॉटेलात; एकाचा मृत्यू, सात जण जखमी
'लव्ह जिहाद' कायद्याचे मुख्यमंत्री फ़डणवीसांनी केले समर्थन!
बिग NEWS : आयपीएल-2025चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर, कोणता संघ कोणासोबत लढणार!
शरद पवारांचा युवा आमदार अजित पवारांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात रंगली चर्चा!