श्री महालक्ष्मी देवीच्या कृपेसाठी मार्गशीर्ष गुरुवारी करावी पूजा

On
श्री महालक्ष्मी देवीच्या कृपेसाठी मार्गशीर्ष गुरुवारी करावी पूजा

वंदना वेदपाठक : आज मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आहे आणि या दिवशी श्री महालक्ष्मी देवीची कृपा अखंड रहावी यासाठी पूजा अर्चना केली जाते.धार्मिक मान्यतेनुसार या महिन्याला अधिक महत्त्व आहे. मार्गशीर्ष महिन्यात शंकर भगवान, महालक्ष्मी आणि श्रीविष्णूची पूजा केली जाते. हा महिना सुरु झाला की, मार्तंडभैरव षड् रात्रोत्सवारंभ सुरु होतात. तर गुरुवारी महालक्ष्मीची पूजा केली जाते. या महिन्यामध्ये भगवान श्रीकृष्णांची पूजा करणे आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे हे देखील शुभ मानले जाते.  मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आणि पूजा मांडणी कशी करावी याबद्दल आपण माहिती घेऊ

यावेळी मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात सोमवार 2 डिसेंबरपासून झाली आहे. यावेळी 4 मार्गशीर्षचे गुरुवार येत आहेत.

पहिला मार्गशीर्ष गुरुवार- 5 डिसेंबर 2024

दुसरा मार्गशीर्ष गुरुवार - 12 डिसेंबर 2024

तिसरा मार्गशीर्ष गुरुवार - 19 डिसेंबर 2024

चौथा मार्गशीर्ष गुरुवार - 26 डिसेंबर 2024

असे चार गुरुवारी पूजा करावी .मार्गशीर्ष गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे. त्यानंतर व्रताचा संकल्प करावा. माता लक्ष्मीची पूजा ज्या जागेवर करायची आहे, ती जागा स्वच्छ करुन तिथे पाटाभोवती रांगोळी काढावी. नंतर एका
चौरंगावर लाल कपडा ठेवून त्यावर तांदूळ व वर तांब्याचाकलश ठेवावा. कलशाला हळद-कुंकु लावून आत पाणी, अक्षता, दूर्वा, एक नाणं आणि सुपारी घालावी.
कलशावर विड्याची पाने अथवा आंब्याची पानं ठेवून त्यावर नारळ ठेवावा. यानंतर चौरंगावर अंथरलेल्या लाल कपडावर थोडे तांदूळ पसरवून त्यावर कलशाची स्थापना करा, आता चौरंगावर श्री लक्ष्मीदेवीचा फोटो किंवा लक्ष्मीची मूर्ती ठेवा. विडा, फळे, खडीसाखर  ठेवावीत. आणि त्याची विधीवत पूजा करा.

अलीकडे मार्केटमध्ये देवीचे मुखवटे देखील  मिळतात. श्रीफळाला त्यांचा साजशृंगार करुन आपण पूजा करु शकतो.देवीची विधीवत पूजा करुन, महालक्ष्मीची कथा वाचा, नैवेद्य अर्पण करा.

मार्गशीर्ष महिन्याचे शुभ फल प्राप्ती साठी दर गुरुवारी महालक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे. या महिन्यात भगवान विष्णूच्या पूजेचं जेवढं महत्त्व आहे,तेवढंच महत्त्व त्यांच्या देवी लक्ष्मीच्या पूजेचं आहे. असं मानलं जातं की, जो कोणी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी देवी लक्ष्मीचं व्रत करतो. देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाचा वर्षाव त्याच्या आयुष्यात होतो. देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने त्यांच्या घरातील संपत्तीचं भांडार भरलेलं राहतं.

Tags:

Advertisement

Latest News

'लाडकी बहीण' योजनेसंदर्भात आता केवायसीचा नवीन नियम!  'लाडकी बहीण' योजनेसंदर्भात आता केवायसीचा नवीन नियम!
Ladki Bahin Yojna New Rule for KYC :  लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीचा हप्ता येण्याची लाडक्या बहिणी वाट बघत असतानाच, आता...
1 एप्रिलपासून वाहनधारकांसाठी 'हा' नवीन नियम लागू...!
महाकुंभाचा परिणाम; अयोध्येतील राम मंदिराने उत्पन्नाचे विक्रम मोडले!  
भरधाव स्कॉर्पिओ घुसली हॉटेलात; एकाचा मृत्यू, सात जण जखमी
'लव्ह जिहाद' कायद्याचे मुख्यमंत्री फ़डणवीसांनी केले समर्थन!
बिग NEWS : आयपीएल-2025चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर, कोणता संघ कोणासोबत लढणार!
शरद पवारांचा युवा आमदार अजित पवारांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात रंगली चर्चा!