Health News : वाढत्या थंडीत कशी घ्यावी आपल्या हृदयाची काळजी
कशामुळे वाढतो नेमका त्रास, घरी जेवताना आहारात काय बदल करावा
Health News : नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून थंडी बहुतांश सर्वच भागात सुरू झालेली आहे. थंडीत अनेकांना स्किन प्रॉब्लेम, हेअर प्रॉब्लेम्स खूप जास्त जाणवतात.थंडीत हृदयाच्या रुग्णांनाही खूप त्रास होतो. त्यामुळे अनेकदा हॉर्ट ॲटॅक, हॉर्ट ब्लॉकेजचा त्रास होऊ शकतो. विशेषतः थंडीच,हृदयाचा आजार असणाऱ्या लोकांनी काळजी घ्यायची असते. हृदयाचा आजार असणाऱ्या लोकांनी काय काळजी घ्यावी याबाबत जाणून घेऊया.
.jpeg)
थंडीमध्ये आपल्या शरीरातील रक्तवाहिन्या गोठण्याचे प्रमाण खूप जास्त असते. वाढत्या थंडीमुळे हा त्रास होऊ शकतो.ज्यावेळी आपल्या शरीरात रक्ताच्या गुठळ्या होतात तेव्हा हृदयावर जास्त ताण येण्याची शक्यता असते.या काळात हृदयाला थोडा जास्त पम्प करावे लागते, त्यामुळे रक्तदाबदेखील वाढू शकतो.
थंडीच्या काळात आपलं खाणं खूप जास्त होतं. त्यामुळेदेखील अनेकदा त्रास होतो. थंडीच्या काळात नेहमी गरम,ऊबदार कपडे घालावेत.रात्रीच्या वेळी शक्यतो बाहेररात्रीच्या वेळी शक्यतो बाहेर पडू नये.
रात्री खूप जास्त थंडी असते, त्यामुळे शरीराला खूप त्रास होऊ शकतो. त्यामुळे ऊबदार कपडे, हातात हातमौजे घालून बाहेर पडावे.ज्या गोष्टींनी शरीराला उर्जा मिळेल, असे पदार्थ खावेत. थंडीच्या दिवसात अक्रोड, बदाम या पदार्थांचा तुमच्या आहारात समावेश करावा.
थंडीत हृदयविकाराच्या आजाराचे प्रमाण का वाढते ते जाणून घेऊ?
थंडीत हृदयविकाराचे रुग्ण जास्त प्रमाणात वाढतात. थंडीत आपल्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. रक्तवाहिन्या आकुंचन पावल्यामुळे शरीराला रक्तपुरवठा होण्यासाठी अडथळे निर्माण होतात. त्यामुळे हृदयविकाराचे आजार होण्याची शक्यता असते.
थंडीत आहारात अनेक पथ्य पाळले पाहिजेत. आहारात ड्रायफ्रुट्सचा समावेश करायला हवा.शरीरात उर्जा राहणाऱ्या पदार्थांचा समावेश करायला हवा, जसे की तीळ, बदाम ,खारीक इत्यादी. आणि कडधान्यांमध्ये मटकी धान्यामध्ये बाजरी,नाचणी इ.

(टीप- लातूर व्हाईसने ही माहिती इंटरनेट स्त्रोतावरुन दिलेली आहे, कोणतेही उपचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा